घरक्रीडाटोकियो ऑलिम्पिक होण्यासाठी कोरोना विषाणूवर लस महत्त्वाची!

टोकियो ऑलिम्पिक होण्यासाठी कोरोना विषाणूवर लस महत्त्वाची!

Subscribe

कोरोनावर लस सापडणे महत्त्वाचे आहे असे ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांना वाटते.

पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिक होण्यासाठी कोरोना विषाणूवर लस सापडणे किंवा त्यावर उपचार मिळणे खूप महत्त्वाचे आहे, असे विधान ऑलिम्पिक आयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी केले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यावर्षी होणार होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला (आयओसी) ही स्पर्धा एका वर्षाने पुढे ढकलणे भाग पडले. आता ही स्पर्धा पुढील वर्षी म्हणजेच २०२१ मध्ये होणार आहे. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न झाल्यास पुढील वर्षीही ऑलिम्पिक घेणे अवघड जाऊ शकेल अशी भीती आयओसी आणि जपानी आयोजकांना आहे. त्यामुळे कोरोनावर लस सापडणे महत्त्वाचे आहे असे मोरी यांना वाटते.

परिस्थितीत सुधारणा होईल 

टोकियो ऑलिम्पिक पुढील वर्षी ठरल्याप्रमाणे होणे कोरोनाच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने कोरोनावर लस किंवा एखादे औषध सापडणे खूप महत्त्वाचे आहे, असे मोरी म्हणाले. तसेच सध्या जशी परिस्थिती आहे, ती पुढील वर्षीही कायम राहिल्यास टोकियोमध्ये ऑलिम्पिक होऊ शकेल का, असे विचारले असता मोरी यांनी सांगितले की, सध्याची परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही पुढील वर्षी या स्पर्धेचे आयोजन करू शकणार नाही. मात्र, पुढील वर्षीपर्यंत ही परिस्थिती कायम राहील असे मला वाटत नाही.

- Advertisement -

…तर स्पर्धा रद्दच करावी लागेल

कोरोनाचा धोका लक्षात घेऊन टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी रिकाम्या स्टेडियममध्ये म्हणजेच प्रेक्षकांविना होऊ शकेल असे म्हटले जात आहे. मात्र, असा कोणताही प्रस्ताव ठेवण्यात आला नसल्याचे योशिरो मोरी यांनी स्पष्ट केले. पुढील वर्षी प्रेक्षकांविना ऑलिम्पिक घेणे हा एकमेव पर्याय असल्यास आम्ही त्याबाबत विचार करू. मात्र, माझ्या मते प्रेक्षकांविना ऑलिम्पिकसारखी स्पर्धा होऊ शकत नाही. तसे झाल्यास आम्हाला बहुधा ही स्पर्धा रद्दच करावी लागेल, असे मोरी यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -