घरदेश-विदेशडावे भाजपसोबत एकटे लढू शकत नाही : अमित शाह

डावे भाजपसोबत एकटे लढू शकत नाही : अमित शाह

Subscribe

मुळात कम्युनिट पक्षाला कळून चुकलं आहे की ते भाजपसी एकटने लढू शकत नाही. म्हणून तर त्यांनी कॉंग्रेससोबत युती केली आहे. या दोन्ही पक्षांनी त्रिपुरासाठी काहीही केलेले नाही. भाजपने त्रिपुराचा विकास केला. येथील आदिवासींना केवळ आश्वासने देण्यात आली. त्यांचा विकास मात्र भाजपने केला, असा दावा मंत्री अमित शाह यांनी केला. 

 

नवी दिल्लीः डावे पक्ष भाजपसोबत एकटे लढू शकत नाही. म्हणून त्यांनी कॉंग्रेससोबत युती केली आहे, अशी टीका करत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रविवारी कॉंग्रेस व कम्युनिस्ट पक्षावर निशाणा साधला.

- Advertisement -

चित्रापुरा येथील चांदीपूर येथे निवडणूक रॅलीत अमित शाह सहभागी झाले होते. त्यावेळी ते म्हणाले, कम्युनिस्टांनी शेकडो कॉंग्रेसजनांनी मारले. आज त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे इलू इलू सुरु आहे. त्यामुळे अशा कॉंग्रेसचे काय करावे असा प्रश्न आहे. खरतर कॉंग्रेसला याची लाज वाटालयला हवी.

मुळात कम्युनिट पक्षाला कळून चुकलं आहे की ते भाजपसोबत एकट्याने लढू शकत नाही. म्हणून तर त्यांनी कॉंग्रेसशी युती केली आहे. या दोन्ही पक्षांनी त्रिपुरासाठी काहीही केलेले नाही. भाजपने त्रिपुराचा विकास केला. येथील आदिवासींना कॉंग्रेसकडून केवळ आश्वासने देण्यात आली. त्यांचा विकास मात्र भाजपने केला, असा दावा मंत्री अमित शाह यांनी केला.

- Advertisement -

दरम्यान, १९ फेब्रुवारीला अमित शाह कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. त्यांच्याकडून ‘मिशन कमळ’ असा नारा देण्यात येणार असल्याचे सुद्धा बोलले जात आहे. मंत्री अमित शहा यांच्या पत्नी या कोल्हापूरच्या असल्याने कोल्हापूरचे जावई सासरी भाजपची ताकद वाढावी यासाठी स्वतः मैदानात उतणार असल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूरच्या शेजारी असलेले जिल्हे सोलापूर आणि सांगली येथे नेहमीच भाजपचे उमेदवार निवडून येत असतात. पण अनेकदा प्रयत्न करून सुद्धा कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या लोकसभेच्या दोन्ही जागांवर एकदाही कमळ फुलू शकले नाही. 2019 च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेना-भाजपच्या युतीमुळे या जिल्ह्यात असलेल्या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊन आले. पण सरकार स्थापन करण्याच्यावेळी शिवसेनेने भाजपशी फारकत घेतल्याने भाजपला हा आनंद फार काळ टिकवता आला नाही.

पण शिवसेनेमध्ये देखील फूट पडल्याने शिवसेनेतून निवडून आलेले खासदार हे शिंदे गटात गेले. सध्या शिंदे गट आणि भाजपची सत्ता राज्यात आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे का असेना पण भाजपची कोल्हापूरात देखील सत्ता आहे. पण भाजपचे वरिष्ठ नेते यामध्ये समाधानी नाहीत. कोल्हापूरमध्ये भाजपचा हक्काचा उमेदवार निवडून आणण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शहा स्वतः या मतदारसंघात लक्ष घालणार आहेत, असे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -