घरताज्या घडामोडीउद्धव ठाकरेंनी मोदींच्या 'वन नेशन वन इलेक्शन'ला पाठिंबा द्यावा, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

उद्धव ठाकरेंनी मोदींच्या ‘वन नेशन वन इलेक्शन’ला पाठिंबा द्यावा, देवेंद्र फडणवीसांचा पलटवार

Subscribe

भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राची सेवा केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच प्रकृतीच्या कारणात्सव राज्यपालांनी राजीनामा दिल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हिंमत असेल तर सर्व निवडणुका एकत्र घ्या, आम्ही तयार आहोत, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी भाजपला दिलं. त्याला अनुसरून उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे असं काहीतरी बोलत असतात. आता यामध्ये हिंमतीचा काय विषय आहे. भारताच्या संविधानाप्रमाणे सर्व निवडणुका एकत्रित नाहीयेत. उद्धव ठाकरे सर्व पक्षांचे नेते झाले असून ते सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करत आहेत. त्यांनी सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करावं आणि मोदींच्या वन नेशन वन इलेक्शनला पाठिंबा द्यावा, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

- Advertisement -

उद्धव ठाकरेंना जैन समाजानंतर आता उत्तर भारतीयांची आठवण येत आहे. अशाच पद्धतीची आठवण जर त्यांनी केली, तर त्यांचं महत्त्व या राजकारणात राहील. त्यामुळे कोण हिंदुत्ववादी आहे आणि कोण नाही हे सर्व जनतेला माहिती आहे. ज्यांनी बाळासाहेब ठाकरे असे नाव लिहून उर्दूमध्ये कॅलेंडर काढले, हे सर्व जनतेला माहिती आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

गळ्यात पट्टा बांधुन फिरणे आमचे हिंदुत्व नाही – उद्धव ठाकरे

- Advertisement -

जर आम्ही युती तोडून काँग्रेसशी हात मिळवणी केली आहे तर त्यासाठी आम्हाला भाजपने भाग पाडले. जर भाजपसोबत जावे लागले असते तर गळ्यात पट्टा बांधून फिरावे लागले असते. जसे की आज आमची काही लोक गळ्यात पट्टा बांधून त्यांच्याकडे गेले आहेत. हे आमचे हिंदुत्व नाही. गळ्यात पट्टा बांधून कोणाची तरी गुलामगिरी करणे हे मला माझ्या शिवसेना प्रमुखांनी शिकवले नाही आणि ते मी कधीच करणार नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट आणि भाजप पक्षाला लगावला.


हेही वाचा : हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -