घरदेश-विदेशAmit Shah : शहांच्या एडिटेड व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

Amit Shah : शहांच्या एडिटेड व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर

Subscribe

अमित शहांचा एडिटेड व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. 

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा एडिटेड व्हिडीओमध्ये कथितपणे एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत, मात्र हा व्हिडीओ एडिटेड असल्याचे पीटीआयच्या फॅक्ट चेकमध्ये सिद्ध झाले आहे. यानंतर आता एडिटेड व्हिडीओप्रकरणी रविवारी (28 एप्रिल) एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हा एडिटेड व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी गृह मंत्रालयाच्या तक्रारीवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. (Amit Shahs edited video case FIR filed)

एडिटेड व्हिडीओमध्ये अमित शहा सरकार स्थापन होताच एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्यासंदर्भात, तसेच मुस्लिम समाजाला दिलेले आरक्षण काढून टाकण्यासंदर्भात बोलताना दिसत आहेत. अलीकडेच कर्नाटक सरकारने मुस्लिमांचा ओबीसी यादीत समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर अमित शहांचा हा एडिटेड व्हिडीओ तेलंगणा काँग्रेसकडून शेअर करण्यात आला होता. याप्रकरणी आता अमित शहांचा व्हिडीओ शेअर करणाऱ्या सर्व लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल सायबर विंगने आयपीसीच्या कलम 153/1530ए/465/469/171जी आणि आयटी कायद्याच्या कलम 66सी अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

- Advertisement -

अमित शहा काय म्हणाले? (What did Amit Shah say?)

एडिडेट व्हिडीओप्रकरणी अमित शहा यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. त्यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, राहुल गांधी आणि काँग्रेस आरक्षणाबाबत देशवासीयांची दिशाभूल करत आहेत. तुष्टीकरणासाठी काँग्रेसने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात अल्पसंख्याकांना आरक्षण देऊन आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला आहे. एससी-एसटी, ओबीसींना जामिया आणि एएमयूसारख्या संस्थांमध्ये वंचित ठेवले आहे. पण मोदीजींची ही हमी आहे की जोपर्यंत भाजपा आहे, काँग्रेस आरक्षणाला हातही लावू शकणार नाही.

- Advertisement -

एडिटेड व्हिडीओप्रकरणी अमित मालवीय काय म्हणाले? (What did Amit Malviya say about the edited video?)

भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी 27 एप्रिल रोजी अमित शहांचा तेलंगणा काँग्रेसकडून फेसबुकवर शेअर केलेला एडिटेड व्हिडीओ पोस्ट करत म्हटले होते की, तेलंगणा काँग्रेस एक एडिटेड व्हिडीओ पसरवत आहे, जो पूर्णपणे एडिटेड आहे. या व्हिडीओमुळे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री अमित शहा हे एससी\एसटी आणि ओबीसीचा वाटा कमी करून असंवैधानिक पद्धतीने मुस्लिमांना दिलेले आरक्षण काढून टाकण्याबाबत बोलताना दिसत आहेत. हा एडिटेड व्हिडीओ काँग्रेसच्या अनेक प्रवक्त्यांनी पोस्ट केला आहे. त्यामुळे आता त्यांनी कायदेशीर कारवाईसाठी तयार राहावे, असा इशाराही अमित मालवीय यांनी दिला होता.

Edited By – Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -