अॅपलने केली कर्मचाऱ्यांची मोठी कपात; जाणून घ्या नेमकं कारण

अॅपलने सुमारे कंपनी सोबत करार असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. दरम्यान कंपनीने अशा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त केली आहेत. ज्यांच्यावर कंपनीत नवे कर्मचारी भरती करून घेण्याची जबाबदारी होती. अॅपल कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

जगभरात सुप्रसिद्ध असलेलय अॅपलने(apple) कंपनीने आपल्या काही कर्मचार्‍यांची कपात केली आहे. याच दरम्यान मिळालेलया अहवालानुसार, गुगलने टाळेबंदीच्या सूचना दिल्या आहेत दरम्यान ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अॅपलने सुमारे कंपनी सोबत करार असलेल्या 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.(cost cutting) दरम्यान कंपनीने अशा कर्मचाऱ्यांची पदे रिक्त केली आहेत. ज्यांच्यावर कंपनीत नवे कर्मचारी भरती करून घेण्याची जबाबदारी होती. अॅपल कंपनीने हा मोठा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा – पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर घसरले

याच संदर्भांत मिळालेल्या माहितीनुसार, अॅपल कंपनीतील ज्या कर्मचाऱ्यांच कंपनी सोबत असलेला करार संपला आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांचा दोन आठवड्यांचा पगार आणि वैद्यकीय लाभ मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर कंपनीचे जे कर्मचारी कायम आहेत त्यांना मात्र कामावरून काढण्यात आलेले नाही.

हे ही वाचा – रेपो रेट वाढल्यामुळे बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना झटका, कर्जाचे हप्ते वाढवले

कंपनीच्या सध्याच्या आर्थिक गरजांमुळे ही कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. असे अॅपलने कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. चीफ एक्झिक्युटिव्ह टिम कुक यांनी मागील महिन्यात सांगितले होते की अॅपल आपला खर्च कमी करेल. “आम्ही मंदीच्या काळात गुंतवणुकीवर विश्वास ठेवतो,” असे टिम कुक यांनी म्हटले आहे. “आणि म्हणून आम्ही लोकांना कामावर पुढे घेऊ आणि कामाच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करू. यापूर्वी, टेक जायंट गुगलने आपल्या कर्मचार्‍यांना सांगितले की भविष्यात यातून कंपनीला आर्थिक फायदा झाला नाही तर पुन्हा कर्मचारी कपात करण्यात येईल.

हे ही वाचा – राष्ट्रपतींच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरून अजित पवारांचा नाव न घेता राज्यपाल भगत सिंह कोश्यारींना टोला

याच संदर्भांत गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या महिन्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, ते अनेक कर्मचाऱ्यांचे काम असमाधानीकारक आहे. त्याचबरोबर सुंदर पिचाई यांच्या म्हणण्यानुसार, गुगलच आर्थिक उत्पन्न जेवढे हवे होते त्यापेक्षा ते खूप कमी आहे.