घरदेश-विदेशAnju ने पाकिस्तानातील नवऱ्याला दिला असा सल्ला की, वाचून तुमचेही डोके चक्रावेल...

Anju ने पाकिस्तानातील नवऱ्याला दिला असा सल्ला की, वाचून तुमचेही डोके चक्रावेल…

Subscribe

पाकिस्तानातून मायदेशी परतलेल्या अंजूकडून नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. जे वाचून आणि ऐकून अनेकांचे डोके चक्रावले आहेत.

नवी दिल्ली : पाकिस्तानात राहणाऱ्या प्रियकराला भेटायला गेलेली अंजू ही काही दिवसांपूर्वी भारतात परतली आहे. 29 नोव्हेंबरला मायदेशी आलेल्या अंजूने भारतात ती तिच्या मुलांना भेटायला आली असल्याचे सांगितले. अंजू फक्त पाकिस्तानात तिच्या प्रियकरालाच भेटायला गेली नव्हती तर तिने तिथे जाऊन त्याच्यासोबत लग्न देखील केले. याबाबतचा व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. खरं तर अंजू पाकिस्तानात केवळ एका महिन्यासाठी गेली होती. मात्र, सीमा हैदरमुळे जी पाकिस्तानातून भारतात आली तिच्यामुळे अंजूला तिचा पाकिस्तानातील मुक्काम वाढवावा लागला, असे स्वतः अंजूने सांगितले आहे. अंजूकडून नेहमीच वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये नवनवे खुलासे करण्यात येत आहेत. जे वाचून आणि ऐकून अनेकांचे डोके चक्रावले आहेत. (Anju advises Pakistani husband Nasrullah to remarry)

हेही वाचा… पाकिस्तानातून भारतात परतलेल्या Anju कडून वारंवार नवे खुलासे, आता म्हणाली…

- Advertisement -

अंजूला एका मुलाखतीत काही प्रश्न विचारण्यात आले, ज्या प्रश्नांची तिने बिधास्तपणे उत्तर दिली आहेत. नसरुल्लाह विवाहित आहे का?, असा प्रश्न अंजूला विचारला असता ती नाही म्हणाली. पण अविवाहित असलेल्या नसरुल्लासोबत लग्न करताना विचित्र वाटले नाही का, असे तिला विचारले असता तिने सांगितले की, मी त्यांना (नसरुल्ला) सर्व काही सांगितले होते. मी इथे येतानाही त्यांना सगळं काही स्पष्ट सांगून आले आहे. तुम्हाला एखादी मुलगी आवडली तर तुम्ही लग्न करू शकता. मग म्हणू नका मला संधी दिली नव्हती, असा एक प्रकारे सल्लाच तिने नसरुल्लाहला दिला आहे.

तर, शत्रूराष्ट्रात जाताना भीती वाटली नाही का, असे अंजूला विचारताच ती म्हणाली की, मी अनेक वर्षे नसरुल्लासोबत बोलत होते. त्यामुळे माझा विश्वास होता. मी त्यांच्या कुटुंबासोबतही बोलले होते. त्यामुळे पाकिस्तान जाण्याचा निर्णय घेणे जड गेले नाही. मी नसरुल्लासोबत निकाह केला आहे. त्याशिवाय धर्मांतरही केले आहे, असा खुलासाही यावेळी तिच्याकडून करण्यात आला. मी सीमा ओलांडून बस पकडली आणि थेट नसरुल्लाचे घर गाठले. तिकडे माझे स्वागत झाले. शेजारचे लोक भेटायला आले. पण आता मी मुलांसाठी भारतात आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पाकिस्तानात जायचे की नाही, याबाबतचा निर्णय हा मुलांच्या भवितव्याचा विचार करून घेईन. मुलांची भारतात राहण्याची इच्छा असेल तर मी भारतात राहीन, मी पाकिस्तानला गेले नाही, तर नसरुल्ला भारतात येईल, अशी स्पष्ट माहिती अंजूकडून देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -