घरदेश-विदेश'तुमचे मत देश बदलू शकतो' - अरविंद केजरीवाल

‘तुमचे मत देश बदलू शकतो’ – अरविंद केजरीवाल

Subscribe

मतदानाचा हक्क आवश्यक बजावा. ज्यांनी तुमचे कामं केलेत त्यांना जरूर मतदान करा

लोकसभा निवडणूकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज राजधानीच्या सात जागांवर होत आहे. भाजपा, आम आदमी आणि कॉंग्रेस यांच्यात तिहेरी लढत बघायला मिळत आहे. या लोकसभेच्या जागांवर १३ हजार ८१९ मतदान केंद्रांवर रविवारी सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरूवात होऊन संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असणार आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत लोकांना मतदान करण्याचे अवाहन केले आहे.

- Advertisement -

अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून सांगितले की, मतदानाचा हक्क आवश्यक बजावा. ज्यांनी तुमचे कामं केलेत त्यांना जरूर मतदान करा. तुमचे एक मत देशाला बदलू शकतो.

दिल्लीतील सात जांगाशिवाय उत्तर प्रदेशच्या १४, हरियाणा, बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालच्या आठ तसेच झारखंडच्या चार जागांसाठी मतदान होत आहे. दिल्लीतील या जागांवर माजी मुख्यमंत्री शीला दिक्षीत, केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन आणि माजी क्रिकेटर गौतम गंभीर असे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -