घरदेश-विदेशकाँग्रेस आणि भाजपमध्ये छुपी युती - केजरीवाल

काँग्रेस आणि भाजपमध्ये छुपी युती – केजरीवाल

Subscribe

काँग्रेस आणि भाजपमध्ये छुपी युती आहे, असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. काँग्रेससोबत युती व्हावी, यासाठी केजरीवाल आग्रही होते. परंतु, काँग्रेसने केजरीवाल यांच्या या आग्रहाला फटकारले आहे. त्यामुळे केजरीवाल यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

काँग्रेस आणि भाजपमध्ये छुपी युती आहे, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी ट्विटरवर केला आहे. मंगळवारी आम आदमी पार्टी(आप) आणि काँग्रेस यांच्यात युती संदर्भात महत्त्वाची बैठक पार पाडली. मोदी सरकारला हरवण्यासाठी आपची काँग्रेससोबत युती व्हावी, असा हट्ट केजरीवाल यांचा होता. यासाठीच ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे दिल्ली प्रदेश अध्यक्षा शीला दीक्षित उपस्थित होत्या. परंतु, या बैठकीत एकमत न झाल्याने काँग्रेसने युती करण्यास नकार दिला. या नकारानंतर केजरीवाल काँग्रेसवर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी ट्विटरवर काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.

नेमकं काय म्हणाले केजरीवाल?

अरविंद केजरीवाल काँग्रेसवर चांगलेच भडकले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर म्हटले आहे की, ‘संपूर्ण देशाला मोदी आणि अमित शहा यांच्या जोडीला हरवायचं आहे, परंतु काँग्रेस भाजप विरोधी मतांना वाटून भाजपची मदत करत आहे. अशी अफवा देखील आहे की, काँग्रेस आणि भाजपमध्ये छुपी युती आहे. भाजप आणि काँग्रेसच्या युतीशी लढायला दिल्ली सज्ज आहे. जनता या युतीला नक्की हरवणार.’

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -