घरमहाराष्ट्रमराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत धक्काबुक्की

मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत धक्काबुक्की

Subscribe

मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये धक्काबुक्की झाली. राजकीय भूमिका घ्यायची किंवा नाही या मुद्द्यावर धक्काबुक्की झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

औरंगाबादमध्ये आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत गोंधळ झाला आहे. या बैठकीमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांमध्ये धक्काबुक्की झाली. राजकीय भूमिका घ्यायची किंवा नाही या मुद्द्यावर धक्काबुक्की झाली असल्याची माहिती समोर येत आहे. संजीव भोर आणि विनोद पोखरकर यांच्यापासून बैठकीत वादाला सुरुवात झाली. त्यानंतर मनोज गायके, अंकित चव्हाण यांच्यात धक्काबुक्की झाल्यानंतर दोन्ही गटातील समर्थक एकमेकांना भिडले आणि तुफान धक्काबुक्की झाली.


राज्यात सुरु असलेल्या नोकर भरतीत खुल्या प्रवर्गातील पदे न भरण्याचा आणि मराठा समाजाला देऊ केलेल्या आरक्षणानुसार पदभरती न करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी औरंगाबादच्या हॉटेल विंडसर कॅसलमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. मात्र या बैठकीमध्ये गोंधळ होत धक्काबुकी झाली. दोन गटातील समर्थकांनी ऐकमेकांना धक्काबुक्की केली.

- Advertisement -

हेही वाचा –

मराठा क्रांती मोर्चाचे सरकारविरुद्ध गाजर दाखवा आंदोलन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -