घरदेश-विदेशमित्रांसमोर काढले पत्नीचे कपडे आणि केली अमानुष मारहाण

मित्रांसमोर काढले पत्नीचे कपडे आणि केली अमानुष मारहाण

Subscribe

पतीच्या मित्रांसोबत नृत्य करण्याच नकार दिल्याने चिडलेल्या पतीने पत्नीसोबत दुष्कृत्य करण्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. महिलांप्रती हिंसाचार आणि विकृती कुठल्या स्तराला जाईल याचे उदाहरण आसमांवर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणातून समोर आले आहे.

‘मला तो मित्रांसोबत नाचायला सांगत होता. पण मी त्याला नकार दिला. मग मात्र त्याने मला बेल्टने मारहाण केली. मित्र आणि नोकरांसमोरच नवऱ्याने माझे कपडे काढले, नंतर नोकरांनी मला धरून ठेवल्यावर त्याने माझे केस कापले आणि ते जाळून टाकले. माझे सर्व कपडे रक्ताने माखले होते. मला त्याने पाईपने बांधले आणि पंख्याला लटकावले होते. मला नग्न करून पंख्याला लटकावण्याची धमकीही तो देत होता.’ …चेहऱ्यावर हातापायांवर जखमा आणि टक्कल केलेल्या दु:खी चेहऱ्याने आसमां अझीझ हे सांगते तेव्हा ऐकणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही.

आसमा ही पाकिस्तानातील लाहोरची महिला, चार दिवसांपूर्वी घरगुती हिंसाचाराची बळी ठरली. तिच्या पतीची इच्छा होती की पार्टीत तिने त्याच्या मित्रांसोबत नाचावे, मात्र तसे करण्यास नकार दिल्यानंतर त्याने तिची ही अवस्था केली. मात्र वेळीच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून त्या नराधम पतीला फैजलला आणि त्याच्या नोकराला पोलिसांनी अटक केली असून सध्या पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

- Advertisement -

आसमांच्या व्हिडिओने उडविली खळबळ

या घटनेनंतर तिचा आर्जव करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. जगभरातील माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतली. सध्या तिला पोलिस संरक्षण पुरविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. डेली मेल ने दिलेल्या वृत्तानुसार आसमां आणि फैजल यांचा निकाह चार वर्षांपूर्वी झाला असून त्यांना तीन मुलेही आहेत. आसमां म्हणते की लग्नानंतर पहिले सहा महिने आनंदात गेले, पण नंतर पतीने मारहाण करायला सुरूवात केली.

- Advertisement -

पंतप्रधान इमरान खान यांच्या मंत्रिमंडळात मानवाधिकार मंत्री असलेल्या शिरीन मजारी यांनी ट्वीट करून सांगितले की त्यांच्या कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेतली असून आसमाचा पती फैजल आणि त्याचा नोकर राशीद अली यांना ताब्यात घेऊन पोलिस कोठडीत डांबण्यात आले आहे. द डॉन या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार आसमा ची वैदयकीय चाचणी केल्यानंतर तिच्या हाताला, डोक्याला अनेक गंभीर जखमा झाल्याचे आढळले. जोपर्यंत वैदयकीय अहवाल येत नाही तोपर्यंत तिच्या पतीला पोलिस कोठडीतच ठेवण्यात येणार आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेला आसमां अझीझचा पती आणि त्याचा नोकर

घटनेनंतर पीडित आसमां पोलिस स्टेशनला मदत मागण्यासाठी गेली होती मात्र तक्रार नोंदवून घेण्यासाठी तिच्याकडे पोलिसांनी लाच मागितल्याचा तिचा आरोप आहे. या प्रकरणाची संबंधित पोलिस अधिक्षकांनी गंभीर दखल घेतल्याचे ‘द डॉन’ ने म्हटले आहे.

जगभरातील महिलांची सुरक्षितता आणि शांतता याबदद्दल जॉर्ज टाऊन या संस्थेने मध्यंतरी सर्व्हेक्षण केले होते. त्यात 153 देशांपैकी पाकिस्तानचा क्रमांक सर्वात शेवटी म्हणजेच 150 वा आहे. महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार आणि अत्याचाराच्या बाबतीत पाकिस्तानचा क्रमांक पहिल्या पाचमध्ये लागतो. 2016 च्या माहितीनुसार पाकिस्तानमधील सरासरी 28 टक्के महिलांनी सांगितले की त्यांच्या जवळच्या नातेवाईकाकडून, पतीकडून त्यांना मारहाण आणि शारीरिक छळ सहन करावा लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -