घरदेश-विदेशभय्यूजी महाराजांची हत्याच - रामदास आठवले

भय्यूजी महाराजांची हत्याच – रामदास आठवले

Subscribe

भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या नाही केली, तर त्यांची हत्या झाली असावी असा संशय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

भय्यूजी महाराज यांनी आत्महत्या नाही केली, तर त्यांची हत्या झाली असावी असा संशय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी भय्यूजी महाराज प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील केली आहे. भय्यूजी महाराज आत्महत्या करणं शक्य नाही असं मला त्यांच्या अनेक निकटवर्तीयांनी सांगितलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये काहीतरी काळबेरं असेल ते शोधून काढावं त्यासाठी मी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. भय्यूजी महाराज आणि माझे चांगले संबंध होते. त्यांच्या अंत्यसंस्काराला देखील मी हजर होतो. भय्यूजी महाराजांच्या हत्येमागे काय कारण असेल हे सांगणं कठिण आहे. पण, हे कारण शोधण्यासाठी त्यांच्या मृत्यूची चौकशी होणे गरजेचं असल्याचं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

१२ जून २०१८ रोजी भय्यूजी महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यानंतर त्यांच्या आत्महत्येबाबत अनेक चर्चा देखील रंगल्या होत्या. भय्यू महाराजांनी आत्महत्या का केली? त्यामागील कारणं काय? ही हत्या का आत्महत्या? या प्रकरणामध्ये अनेक दावे देखील केले गेले. शिवाय, संशयाची सुई देखील काही लोकांवर फिरली. पण, अद्याप ठोस असं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी भय्यू महाराज यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये कुणालाही जबाबदार धरू नये असं म्हटलं आहे. याप्रकरणी आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे सीबीआय चौकशी होणार का? या प्रकरणी कोण दोषी आहे. शिवाय, भय्यू महाराजांनी आत्महत्या का केली? याची उत्तरं मिळणार का? हे पाहावं लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -