घरमहाराष्ट्र१२ वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल कृत्य, २ चालक अटकेत

१२ वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल कृत्य, २ चालक अटकेत

Subscribe

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे - निलख येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीसोबत दोन ड्रायव्हरने चालत्या टेम्पोमध्ये अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी शौकत अजमेर शेख आणि अमोल चंद्रकांत इंगवले यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे – निलख येथे राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीसोबत दोन ड्रायव्हरने चालत्या टेम्पोमध्ये अश्लील कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी शौकत अजमेर शेख आणि अमोल चंद्रकांत इंगवले यांना सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. १२ वर्षीय पीडित मुलीला शाळेत सोडण्याचं निमित्त करत मुलीशी जवळीक साधली गेली. त्यानंतर मुलीशी अश्लिल कृत्य केलं गेलं. दरम्यान, या घटनेची माहिती तिने आईला दिली. त्यानंतर ही घटना समोर आली आहे. त्यानुसार सांगवी पोलिसात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कशी घडली घटना?

पीडित १२ वर्षीय मुलगी औंध येथील शाळेत शिक्षण घेते. गुरुवारी सकाळी ६ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास दोन्ही भावंडांना शाळेत सोडतो असं निमित्त या दोन्ही टेम्पो चालकांनी केलं. प्रत्यक्षात मात्र पीडितेच्या लहान भावाला त्यांनी औंध येथील शाळेत सोडले. त्यानंतर मुलीला घेऊन शनिवार वाड्याच्या दिशेने टेम्पो निघाला. रस्त्यात टेम्पो थांबवत शौकत अजमेर शेखनं अमोल चंद्रकांत इंगवलेला सोबत घेतले. त्यानंतर दोघांनी मुलीशी अश्लील कृत्य करत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.
चुलत बहीण आणि लहान भाऊ शाळा सुटल्यानंतर घरी गेली तेव्हा पीडित मुलीच्या आईने तुझी बहीण आली नाही का? असा प्रश्न विचार तेव्हा ती शाळेत आलीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर हा सारा धक्कादायक प्रकार समोर आला. पीडितेला याबद्दल विचारले असता तिनं सारा प्रकार सांगितला. यानंतर घरच्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रारीनंतर कारवाई करत शौकत अजमेर शेख आणि अमोल चंद्रकांत इंगवले यांना सांगली पोलिसांनी अटक केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -