घरदेश-विदेशतेजप्रताप यादव याने घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे?

तेजप्रताप यादव याने घटस्फोटाचा अर्ज घेतला मागे?

Subscribe

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रताप यादव यांचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांना हा अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि राज्याचे माजी आरोग्य मंत्री तेजप्रताप यादव यांचे लग्न गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. लग्नाच्या अवघ्या सहा महिन्यातच त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र आता त्यांना हा अर्ज मागे घेतला असल्याचे सांगितले जात आहे. साधारण ३ आठवडे ब्रजमध्ये राहिल्यानंतर ते बिहारमध्ये परतले. त्यांच्या घटस्फोटाबाबतची सुनावणी आज, गुरुवारी बिहारच्या फॅमिली कोर्टात होणार होती. परंतू बिहारमध्ये परतल्यावर तेजप्रताप यांनी त्यांचा घटस्फोटाचा अर्ज मागे घेतला असल्याच्या चर्चा रंगत आहेत. परंतू अद्याप याचा खुलासा होऊ शकलेला नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, सुनावणीसाठी तेजप्रताप यादव हे फॅमिली कोर्टात पोहोचलेच नसल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

वाचा : ‘ऐश्वर्या राय सोबत पटत नाही, घटस्फोट हवा’

- Advertisement -

वाचा : ऐश्वर्या खूपच मॉर्डन, मी भोळसट; इच्छेविरुद्ध लग्न झालं

ऐश्वर्या निवडणूक लढवण्याची शक्यता 

या महिन्याच्या सुरुवातीलाच तेजप्रताप यादव यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. माझं ऐश्वर्या राय सोबत पटत नाही मला घटस्फोट हवा. असा अर्ज तेजप्रताप यादव यांनी पाटणा न्यायालयामध्ये केला होता. तेज प्रताप यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आहेत. लग्नाच्या अवघ्या पाच महिन्यानंतर तेजप्रताप यादव यांनी पाटणा न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. १२ मे रोजी तेजप्रताप यादवचं ऐश्वर्या रायसोबत लग्न झालं होतं. ऐश्वर्या राय राजकारणात प्रवेश करणार आहे, अशी चर्चा सुरू होती. पण आता अचानक घटस्फोटाची बातमी आली आहे. ऐश्वर्यासुद्धा राजकीय कुटुंबातून आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सारण येथून तिकीट मिळण्याची शक्यता होती. ऐश्वर्या राष्ट्रीय जनता दलाचे आमदार चंद्रिका राय यांची मोठी मुलगी आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -