घरदेश-विदेशलोकसभेचा अर्ज भरला आणि पोलिसांनी 'चतुर्भुज' केला

लोकसभेचा अर्ज भरला आणि पोलिसांनी ‘चतुर्भुज’ केला

Subscribe

निवडणूक अर्ज भरून परतत असलेल्या तळीराम उमेदवारावर बिहार पोलिसांनी कारवाई केली आहे. बिहारराज्यात मद्यबंदी असूनही या उमेदावराने मद्याचे सेवन केले असल्याचे उघडकीस आले.

बिहार राज्यात मद्यबंदी असली तरीही मद्याचे सेवन सुरुच असल्याचे दिसून येते. बिहारमधील तळीरामांवर पोलीस कारवाई करते मात्र तरीही मद्याचा साठा येथून मोठ्या प्रमाणावर जप्त होतो. देशात निवडणुकीचे वारे वाहत आहे. निडणुकीत अर्जभरण्याची प्रक्रिया बिहार राज्या सुरु आहे. अशामध्ये लोकप्रतिनिधी आपल्या प्रचारात आहेत. आपण केलेल्या कामाची पोचपावती लोकांपर्यंत प्रयत्नात लोकप्रतिनिधी आहेत. अशामध्ये एका अपक्ष उमेदवार मद्याचे सेवन करून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेला असल्याची घटना घडली आहे. उमेदावरी अर्ज भरून परतत असताना पोलिसांनी या तळीराम उमेदावारावर कारवाई केली आहे. राजीव कुमार सिंह (४०) असे या अपक्ष उमेदवाराचे नाव आहे. मद्यावस्थेतच सिंह याने आपला निवडणूक अर्ज दाखल केला. सिंह बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यात नौगुछिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहे.

पहिल्यांदाच केला अर्ज दाखल

राजीव कुमार सिंह याने पहिल्यांदाच निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी निवडणूक अर्ज भरण्यासाठी तो गेला होता. उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी त्याने मद्यपान केले होते. “उमेदवाराच्या वागणूकीवरून त्याने मद्यपान केले असल्याचे वाटत होते. त्याने उमेदवारी अर्ज मद्याच्या नशेतच भरला होता. अर्ज भरल्यानंतर पोलिसांनी त्याची तपासणी ब्रीथ एनालाइजरने केली. तपासणीत उमेदवाराने मद्यपान केल्याचे आढळून आले. यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली.” – निवडणूक अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -