घरमहाराष्ट्र'मुख्यमंत्री घराणेशाहीवर बोलत असतील तर विखे आणि रणजित कशाला हवेत' - रोहित...

‘मुख्यमंत्री घराणेशाहीवर बोलत असतील तर विखे आणि रणजित कशाला हवेत’ – रोहित पवार

Subscribe

भाजपच्या नेत्यांच्या भाषणात विकास हा शब्द येतोय का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री घराणेशाहीवर बोलत असतील तर त्यांना सुजय विखे, रणजित मोहिते-पाटील कशाला पाहिजेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू रोहित पवार यांनी लगावला आहे. भाजपात एवढे लोक घेतली आहेत त्यांची नावं आठवत नाहीत. ‘घराणेशाहीवर बोलताना तुम्ही कसं वागता हे देखील बघितलं पाहिजे’, असं रोहित पवार यांनी म्हटले आहे. वाकड येथे स्थलांतरित नागरिकांशी संवाद साधत असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.

भाजपच्या भाषणात विकास शब्द नाही

रोहित पवार म्हणाले, ‘२०१४ ला भाजपाचा अजेंडा हा केवळ विकास होता. त्यामुळे नागरिकांना देश पुढे जाईल, विकास होईल असं वाटलं. कारण भाजपा सरकारने सोशल मीडियाचा जास्तीत जास्त वापर केला. खोट्या बातम्या व्हायरल केल्या आणि त्यानंतर निवडून आले. परंतू, भाजपच्या नेत्यांच्या भाषणात विकास हा शब्द येतोय का?’ असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसंच, ‘नुकतंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झालं. ते मोठं मोठ्याने ओरडून भाषण करत होते. कारण पुढून टाळीच वाजत नव्हती. मोठ्याने बोलून ते काय म्हणाले, घराणेशाही, शरद पवार हे बोलले पण विकासावर बोला ना, तुम्ही तुमच्या ५ वर्षात काय केलं ते सर्वाना सांगा हाच प्रश्न सर्वांनी उपस्थित केला पाहिजे’, असं रोहित पवार म्हणाले.

- Advertisement -

मोहिते – विखे गेले जाऊ द्या

रोहित पवार यांनी यावेळी घराणेशाहीवर बोलताना असे म्हणाले की, ‘नाहीतर होत काय? मोहिते गेले, विखे गेले जाऊ द्या ना….घराणेशाहीवर भाजपा बोलते आताही ते बोलताच. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे हे घराणेशाहीच्या विरोधात बोलायचे. परंतु, त्यांनी दुसऱ्या पक्षातून राजकीय वारसा असलेल्याना पक्षात घेतलं. तसेच घराणेशाहीच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे हे बोलत असत. त्यावेळी राज ठाकरे यांची क्षमता होती. ती असताना सुद्धानंतर त्यांनी विचार कोणाचा केला’, घराणेशाहीवर बोलणाऱ्यांना असा टोला त्यांनी लगावला आहे.

साहेब आणि दादा समोर असल्यावर असे होतेच

पार्थ पवार हे त्यांच्या पहिल्या भाषणावरून ट्रोल झाल्यानंतर रोहित म्हणाले, ‘एका भाषणावरून किती बाऊ करता हे आपण समजून घेतलं पाहिजे. साहेब आणि दादा समोर असल्यानंतर मलाही कधी कधी बोलता येत नाही. तशी परिस्थिती पार्थ पवारची झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -