घरदेश-विदेशकर्नाटकात भाजपची खेळी; अपात्र आमदारांना दिले तिकीट

कर्नाटकात भाजपची खेळी; अपात्र आमदारांना दिले तिकीट

Subscribe

दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने १७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवेल होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपात प्रवेश केला.

कर्नाटकात येत्या ५ डिसेंबरला पोटनिवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ बंडखोर अपात्र आमदारांची नावे जाहीर केली आहेत. दोन दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने १७ बंडखोर आमदारांना अपात्र ठरवेल होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी भाजपात प्रवेश केला. १७ आमदारांना अपात्र ठरवल्यानंतर त्या मतदारासंघातील जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे त्या जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये १३ अपात्र आमदारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.


हेही वाचा – कर्नाटकातील ‘ते’ आमदार अपात्रच – सुप्रीम कोर्ट

- Advertisement -

काय आहे नेमके प्रकरण?

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वी कर्नाटकातील राजकारणात मोठा भूकंप आला होता. सत्तेतील काँग्रेस आणि जनता दलाच्या १७ आमदारांनी अचानकपणे आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्यानंतर प्रचंड जगद गतीने आणि वेगवेगळ्या नाट्यमय राजकीय घडामोडी बघायला मिळाल्या होत्या. कर्नाटकातील काँग्रेस आमदार सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आयआयटी पवई येथील एका हॉटेलमध्ये राहिली होती. आमदारांच्या या राजीनाम्यामुळे कुमारस्वामी सरकारमध्ये फार मोठी खिंड पडली होती. त्यावेळी काँग्रेसच्या आणि जनता दलाच्या बड्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करण्यासाठी त्यांना भेटण्याचा बराच प्रयत्न केला होता. मात्र, सर्व आमदार मुंबईत आली होती. त्यातील काही आमदार दिल्लीतही गेले होते. याचाच फायदा भाजपने घेतला. भाजपने विधीमंडळात कुमारस्वामी सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान दिले. मात्र, आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे अखेर एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले होते. दरम्यान, विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे विधानसभेच्या सभापतींनी या सतराही आमदारांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे त्यांनी या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. आज या याचिकेवर कोर्टात सुनावणी झाली आणि त्या सुनावणीत १७ आमदार अपात्र असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -