घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करा; महाशिवआघाडीची मागणी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरु करा; महाशिवआघाडीची मागणी

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी गरजू लोकांना मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरु करण्याची विनंती केली आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मंत्रालयातील वैद्यकीय सहाय्यता कक्ष बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गरजू लोकांना मदतीसाठी ताटकळत राहवे लागत आहे. लोकांना ही सुविधा मिळावी म्हणून महाशिवआघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष पुन्हा सुरु करण्याची मागणी केली आहे. यासाठी महाशिवआघाडीच्या नेत्यांकडून मंत्रालयावर मोर्चा देखील काढली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आमदार धनंजय मुंडे यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी गरजू लोकांना मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष सुरु करण्याची विनंती केली आहे. मुंडे यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर राज्यालांना पाठवलेले पत्र शेअर केले आहे.

- Advertisement -


हेही वाचा – शिवसेना-आघाडीविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -