घरदेश-विदेश'भाजपवर बोट उचलाल तर बोटच तोडू'

‘भाजपवर बोट उचलाल तर बोटच तोडू’

Subscribe

'भाजपच्या कार्यकर्त्यांवर बोट उचलाल तर तो बोट छाटून घेऊ', अशी धमकी केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा यांनी विरोधकांना दिली. यावेळी त्यांनी विरोधकांवर सडकून टिकाही केली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. प्रचारसभांमधून नेतेमंडळी विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप, टीका करताना दिसत आहे. दरम्यान, गुरुवारी उत्तर प्रदेशच्या गाझीपूर येथे झालेल्या प्रचारसभेत केंद्रिय मंत्री मनोज सिन्हा यांनी ‘भाजपकडे बोट दाखवाल तर तो बोट चार तासाच्या छाटून टाकू’, अशा शब्दात विरोधकांना धमकी दिली आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

नेमकं काय म्हणाले मनोज सिन्हा?

‘भ्रष्टाचार आणि इतर गुन्ह्यांना जमीनदोस्त करण्यासाठी भाजप कार्यकर्ते तयार आहेत. या कार्यकर्त्यांकडे कुणी बोट दाखवला तर चार तासाच्या आता त्याचा बोट राहणार नाही, याची ग्वाही मी देतो’, असे मनोज सिन्हा आपल्या भाषणात म्हणाले आहेत. यासोबतच ‘कोणी पुर्वांचलचा गुन्हेगार ज्याची गाझीपूरची सीमा ओलांडण्याची लायकी नाही, त्याने कार्यकर्त्यांकडे डोळे वटारुन बघितले तर त्याचे डोळे काढून घेऊ, अशी धमकी सिन्हा यांनी दिली आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -