घरमनोरंजन‘या’ बॉलिवूड कलाकारांनी कमी वयात साकारली वयोवृद्ध भूमिका

‘या’ बॉलिवूड कलाकारांनी कमी वयात साकारली वयोवृद्ध भूमिका

Subscribe

या कलाकारांनी साकारल्या वयोवृद्ध व्यक्तींची भूमिका

नुकतेच दोन बॉलिवूड चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. त्यापैकी अभिनेता सलमाम खानच्या भारत चित्रपटात तो खूप वयस्कर दिसत आहे. याशिवाय अभिनेत्री तापसी पन्नूने इंस्टाग्राम वरून तिच्या सांड की आंख या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. यामध्ये तापसीसह भूमीने ही वयोवृद्धाची भूमिका केली आहे. यांसारखे असे काही कलाकार आहेत, त्यांनी कमी वयातच म्हाताऱ्या व्यक्तींची भूमिका निभावली आहे.

सलमान खान- भारत

सलमान खान ने भारत चित्रपटातील आपला फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना सलमानने असे लिहीले की,” जितने सफेद बाल मेरे सिर पर और दाढ़ी में हैं, उससे ज्यादा रंगीन मेरी जिंदगी है” यामध्ये सलमानचा अनोखा अंदाज बघायला मिळणार असून पाच वेगवेगळ्या भूमिका साकारताना तो दिसणार आहे.

- Advertisement -

तापसी पन्नू और भूमि पेडनेकर – सांड की आंख

‘सांड की आंख’ या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये दोन्ही अभिनेत्री वृद्ध शुटर्स महिलेच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या चेहऱ्यावरील वृद्धत्व दिसावे याकरिता उत्तम मेकअप टेक्निकचा वापर करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. पहिल्या पोस्टरमध्ये तापसी आणि भूमी घागरा, कुर्ता घातलेल्या दिसत आहे. त्या पोस्टरवर “तन बूढ़ा होता है, मन बूढ़ा नहीं होता.” अशी टॅगलाईन दिसत आहे.

- Advertisement -

ऋषि कपूर – ‘कपूर एंड संस’

दिग्दर्शक शकुन बत्राच्या २०१६ साली आलेला ‘कपूर एंड संस’ या चित्रपटात ऋषि कपूरने ९० वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाची भूमिका साकारली होती.

ऐश्वर्या राय बच्चन – ‘सरबजीत’

‘सरबजीत’ या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चनने सरबजीत सिंहच्या बहिणीची म्हणजेच दलबीर कौरची व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटात २२ वर्षाचा काळ दाखवला असून ऐश्वर्याने यात तरूणपणापासून वयस्कर भूमिका निभावली होती.

अमिताभ बच्चन – 102 नॉट आउट

उमेश शुक्ला दिग्दर्शित 102 नॉट आउट मध्ये अमिताभ बच्चन यांनी १०२ वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची भूमिका केली होती. हा विनोदी चित्रपट होता. यात ऋषि कपूरने ही अमिताभच्या ७६ वर्ष असणाऱ्या मुलाची भूमिका केली होती.

रणबीर कपूर – बर्फी

अनुराग बासूच्या बर्फी मध्ये रणबीरने देखील वृद्धाची भूमिका केली होती. यामध्ये रणबीर सोबत प्रियांका चोप्राने वयोवृद्ध महिलेची भूमिका साकारली होती.

प्रियांका चोप्रा – ‘7 खून माफ’

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने ७ वेगवेगळ्या भूमिका केल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ६५ वर्षाची वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -