घरदेश-विदेश'तुम्ही आनंदी रहा'...व्हिडिओ पोस्ट करून BJP खासदाराच्या सूनेचा आत्महत्येचा प्रयत्न

‘तुम्ही आनंदी रहा’…व्हिडिओ पोस्ट करून BJP खासदाराच्या सूनेचा आत्महत्येचा प्रयत्न

Subscribe

लखनऊ येथील मोहनलालगंज येथून भारतीय जनता पक्षाचे खासदार कौशल किशोर यांच्या परिवाराचा फिल्मी ड्रामा जगासमोर आला आहे. भाजपा खासदाराच्या सूनेने त्यांच्या घराबाहेर जाऊन आपल्या हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नापूर्वी या खासदाराच्या सूनचा एक व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमध्ये खासदाराच्या सूनेनं मी माझं आयुष्य संपवत आहे, असे सांगून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले.

असा घडला प्रकार

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपा खासदार कौशल किशोर यांची सून अंकिताने त्यांच्या घराबाहेर हाताची नस कापून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना दूपारी घडल्यानंतर अंकिताला त्वरीत रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. यापूर्वी अंकिताचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तिने मी आत्महत्या करत आहे, असे सांगितले होते. यासह तिने तिचा पती आयुषवर गंभीर आरोप केले होते. यासर्व प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. अंकिताने आपल्या व्हिडिओमध्ये असे सांगितले की,’मी कोणाशी वाद घालू शकत नाही. कारण तुमचे वडिल खासदार आणि आई आमदार आहे, माझं कोणी ऐकून घेणार नाही. मी आजपर्यंत कोणालाही तुम्हाला स्पर्श करु दिला नाही तर मी तुम्हाला कसं मारू शकते, तुम्ही किती खोटं बोलत आहात, तुम्ही आणि तुमच्या कुटूंबाने मला जगण्यासाठी सोडले नाही’

- Advertisement -

यापुढे ती असेही म्हणाली की, ‘मला घराचं भाडं नाही दिलं न घरात कोणत्याही आवश्यक वस्तू भरल्यात, एकदाही विचार नाही केला की, मी काय खाईल आणि कसं जगू शकेल. तुम्ही माझ्या जवळ राहण्यास आले नाही तर मलाही राहायचं नाही. मी माझं जीवन संपवत आहे. तुम्हाला माझी आठवण येईल आणि तुम्ही असाही विचार कराल की माझ्यापेक्षा तुमच्यावर प्रेम करणारं कोणी सापडणार नाही. तुम्ही माझ्या मृत्यूचे कारण आहात आणि तुमचं कुटुंब, तुम्ही आनंदी रहा..मी जात आहे.’

दरम्यान, लखनऊच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या मोहनलालगंजचे भाजप खासदार कौशल किशोर यांची सून अंकिता यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. तत्काळ दाखल झालेल्या अंकिताचा जीव आता धोक्याचे बाहेर आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिताने उजव्या हाताची नस कापण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतीही जखम गंभीर नाही. त्वचेवर जखमा झाल्या आहेत. सर्वकाही व्यवस्थित झाल्यास अंकिताला मंगळवारी हॉस्पिटलमधून घरी डिस्चार्ज देण्यात येईल.


‘तुम्हाला पायाची वेदना जाणवते पण हत्या झालेल्या भाजपाच्या १३० कार्यकर्त्यांच्या मातांची नाही’
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -