घरदेश-विदेशबिजु जनता दलाला राज्यसभेचे उपसभापतीपद?

बिजु जनता दलाला राज्यसभेचे उपसभापतीपद?

Subscribe

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांनी नाराज होणे भाजपला परवडणारे नाही. मित्रपक्षांची नाराजी भाजपला जड जावू शकते ही बाब लक्षात घेऊन भाजपने आता मित्र पक्षांसहीत प्रादेशिक पक्षांना चुचकारण्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यसभेचे उपसभापतीपद नवीन पटनाईक यांच्या बिजु जनता दलाच्या ( बीजेडी )पदरात टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मित्रपक्षांनी नाराज होणे भाजपला परवडणारे नाही. मित्रपक्षांची नाराजी भाजपला जड जावू शकते, ही बाब लक्षात घेऊन भाजपने आता मित्र पक्षांसहीत प्रादेशिक पक्षांना चुचकारण्याला सुरूवात केली आहे. त्यामुळे राज्यसभेचे उपसभापतीपद नवीन पटनाईक यांच्या बिजु जनता दलाच्या (बीजेडी) पदरात टाकण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. नीती आयोगाच्या बैठकीनिमित्त सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत बैठक झाली. यावेळी प्रत्येक राज्याच्या मख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चर्चा केली. यावेळी मित्रपक्षांसह लोकसभा २०१९च्या रणनितीवर देखील चर्चा झाली.

कशी असेल उपसभापतीपदाची निवडणूक?

राज्यसभा उपसभापतीपदाच्या निवडणुकीत उमेदवाराला जिंकण्यासाठी २४५ पैकी १२२ मतांची गरज असणार आहे. राज्यसभेत भाजपची १०६ सदस्य संख्या आहे. यामध्ये एआयएडीएमकेच्या १४ सदस्यांचा देखील समावेश आहे. भाजप राज्यसभेतील मोठा पक्ष आहे तर त्यानंतर काँग्रेसचा नंबर आहे. शिवाय बीजेडीकडे ९ सदस्यांचे संख्याबळ असल्याने बीजेडीची भूमिका देखील या साऱ्या घडामोडीमध्ये महत्त्वाची ठरणार आहेत. पण, बीजेडीने मात्र भाजप अथवा काँग्रेसच्या पाठिंब्याबद्दल कोणताही निर्णय घेतलेला नाही. तत्पूर्वीच भाजपने बीजेडीला उपसभापतीपदाची ऑफर देत काँग्रेसच्या मनसुब्यावर पाणी फेरण्याचा प्रयत्न चालवला आहे. कारण भाजपच्या मित्र पक्षांच्या नाराजीचा आणि प्रादेशिक पक्षांच्या वाढत्या महत्त्वाचा पूर्णपणे फायदा घेण्यावर काँग्रेसचा भर दिसत होता. के. चंद्रशेखर राव यांच्या तेलंगणा राष्ट्र समितीकडे (टीआरएस) ६ सदस्य तर जगमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेसकडे २ सदस्यांची संख्या आहे. या दोन्ही पक्षांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे याचा फायदा काँग्रेसने उचलू नये म्हणून भाजपने बीजेडीला उपसभापतीपदाची ऑफर दिल्याची चर्चा सध्या दिल्लीत रंगली आहे.

- Advertisement -

प्रादेशिक पक्षांचे वाढते महत्त्व

प्रादेशिक पक्षांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपपुढे प्रमुख आव्हान असणार आहे ते प्रादेशिक पक्षांचे. या राजकीय तोंडावर भाजपने आत्ताच पावले उचलायला सुरूवात केली असून राज्यसभेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीनिमित्ताने त्याची प्रचिती येत आहे. बीजेडीला उपसभापतीपदाची ऑफर दिल्यास वायएसआर काँग्रेस, टीआरएस, तृणमुल काँग्रेस हे पक्ष बीजेडीला मदत करण्याची शक्यत दाट आहे. त्यामुळे उपसभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला धुळ चारणे सहज शक्य आहे. याबाबी लक्षात घेऊनच भाजपने बीजेडीला उपसभापतीपदाची ऑफर देत पाठिंब्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुसाठी भाजपची चाल यशस्वी होते की भाजपला मात देण्यात काँग्रेसला यश मिळते हे लवकरत स्पष्ट होईल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -