घरदेश-विदेशपत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना

पत्रकार गौरी लंकेश यांची कुत्र्याशी तुलना

Subscribe

'कर्नाटकात कुत्र्याचा मृत्यू झाला तरी त्याला नरेंद्र मोदी जबाबदार कसे?' असे विधान प्रमोद मुतालिक यांनी केल्याने आता वादाला तोंड फुटले आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी श्रीराम सेनेने फेसबुकवरून आर्थिक मदत करा असे आवाहन केले होते. त्यानंतर प्रमोद मुतालिक यांनी वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

श्रीाराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येवरून धक्कादायक विधान केले आहे.  ‘कर्नाटकात कुत्र्याचा मृत्यू झाला तरी त्याला नरेंद्र मोदी जबाबदार कसे?’ असे विधान प्रमोद मुतालिक यांनी केल्याने आता वादाला तोंड फुटले आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येसाठी श्रीराम सेनेने फेसबुकवरून आर्थिक मदत करा, असे आवाहन केले होते. त्यानंतर प्रमोद मुतालिक यांनी वादग्रस्त विधान केल्याने खळबळ उडाली आहे.

काँग्रेसवर निशाणा

गौरी लंकेश, साहित्यिक कलबुर्गी, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसेर यांच्या हत्येवरून देखील प्रमोद मुतालिक यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘काँग्रेसच्या काळात देखील विचारवंतांची हत्या झाल्या. त्यावेळी कुणीही ब्र काढला नाही किंवा काँग्रेस सरकारला जबाबदार धरले नाही. आता मात्र गौरी लंकेश यांच्या हत्येवरून नरेंद्र मोदी गप्प का?’ असा सवाल करत नरेंद्र मोदींना लक्ष्य केले जात आहे. ‘कर्नाटकात कुत्र्याचा मृत्यू झाला तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार कसे? असे वादग्रस्त विधान प्रमोद मुतालिक यांनी केले आहे. त्यावरून वाद उभा राहिला आहे.

- Advertisement -

गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक एसआयटीने श्रीराम सेनेच्या परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. वाघमारे याने गौरी लंकेश यांच्या हत्येची कबुली दिली. शिवाय बेळगावमध्ये बंदुक चालवण्यासाठी प्रशिक्षण घेतल्याचे देखील मान्य केले. यावेळी वाघमारे यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला असून वाघमारे याने बंगळूरूमध्ये बाईकवरून फिरवणाऱ्या दोन बाईकस्वारांसह हत्येच्या मास्टरमाईंडबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, परशुराम वाघमारेची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र एसआयटी पथक बंगळूरूकडे रवाना झाले आहे. गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाचा तपास आता अधिक जोरात सुरू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -