घरदेश-विदेशBJP’s CM : भाजपाचा सध्याचा स्वभाव आणि चरित्र हेच..., ठाकरे गटाची खोचक...

BJP’s CM : भाजपाचा सध्याचा स्वभाव आणि चरित्र हेच…, ठाकरे गटाची खोचक टिप्पणी

Subscribe

मुंबई : पाचपैकी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला. छत्तीसगडमध्ये विष्णुदेव साय यांना मुख्यमंत्रीपदी नेमले आणि रमण सिंह यांना विधानसभा अध्यक्षपदी बसवले. रमण सिंह यांच्यापासून दिल्लीस धोका नव्हताच. मध्य प्रदेशात आडवाणी युगातील शेवटचा मालुसरा शिवराजसिंह यांना पुन्हा मुख्यमंत्री केले नाही. तेथे बिनचेहऱ्याचे कोणी मोहन यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे नियुक्तीपत्र दिले. राजस्थानात वसुंधराराजे यांनाही दूर करून प्रथमच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांना मुख्यमंत्री केले. यात धक्कादायक, आश्चर्यकारक असे काहीच नाही. भाजपचा सध्याचा स्वभाव आणि चरित्र पाहता यापेक्षा वेगळे घडण्याची शक्यता नव्हतीच, अशी खोचक टिप्पणी ठाकरे गटाने केली आहे.

हेही वाचा – मुंबई मनपातील कामावरून अनिल परब आणि उदय सामंत भिडले

- Advertisement -

पाचपैकी तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांत मुख्यमंत्रीपदाचा कोणताच चेहरा समोर आणला नव्हता. मध्य प्रदेशात शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानात वसुंधराराजे यांनाही महत्त्व दिले नाही. तेव्हाच नक्की झाले होते की, तेथील निवडणुकांचे निकाल हवे तसे लावले जातील आणि शिवराजसिंह चौहान, वसुंधराराजे यांचे काटे दूर करून भाजपाचे नियंत्रण ‘शत प्रतिशत’ आपल्या हाती घेतले जाईल. अखेर तसेच घडले आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

गुजरातमध्ये प्रथमच विधानसभेवर निवडून आलेले भूपेश पटेल यांना मुख्यमंत्री केले, तर महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठीच्या शपथविधीसाठी तयारीत असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री करून झटका दिला. अर्थात हा भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत मामला आहे आणि कुणाला काय करायचे व काढायचे ते त्यांचे हायकमांडच ठरवू शकते, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण द्या; आशिष शेलार यांची मागणी

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढचे मुख्यमंत्री हे पूर्वाश्रमीचे भाजपाच्या विद्यार्थी परिषदेशी संबंधित आहेत. तिन्ही मुख्यमंत्री ‘साठी’च्या आत आहेत. त्यांना राजकारणाचा, प्रशासनाचा अनुभव नाही आणि मुख्य म्हणजे ते लोकनेते वगैरे नाहीत. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत ज्या पद्धतीने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल या पदांवर बिनचेहऱ्याचे लोक नियुक्त केले गेले. तेच धोरण आता मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत राबविले जात आहे. जुन्यांना घरी बसवून नवे नेतृत्व, जे आपल्या कह्यात राहील, अशांना मुख्यमंत्रीपदी बसवले जात आहे, असेही ठाकरे गटाने म्हटले आहे.

हेही वाचा – OBC साठी आनंदाची बातमी : शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी 60 हजार रुपये मिळणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -