घरदेश-विदेशदंतेवाडा येथे चकमक; दोन नक्षलवादी ठार

दंतेवाडा येथे चकमक; दोन नक्षलवादी ठार

Subscribe

छत्तीसगडमधील दंतेवाडा मध्ये पुन्हा एकदा बुधवारी सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले आहेत. या चकमकीनंतर नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

दंतेवाडा परिसरात नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवली. आणि बुधवारी सुरक्षा दलाने शोध मोहिम राबवत नक्षलवाद्यांना चारही बाजूने घेरले.सुरक्षा दलाने शोध मोहीम राबवत नक्षलवाद्यांचा चारी बाजूने घेरले. घेरल्‍याचे लक्षात येताच नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. यावेळी सुरक्षा दलाने जोरदार प्रत्‍युत्तर दिले. यात दोन नक्षलवाद्यांचा खात्‍मा करण्यात आला.

- Advertisement -

या कारवाईत जिल्‍हा रिझर्व्ह गार्ड महिला कमांडो ‘दंतेश्वरी’ने ही सहभाग घेतला होता. डीआरजीच्या या पथकामध्ये आत्‍मसमर्पण केलेल्‍या महिला नक्षलवादी आणि आत्‍मसमर्पण केलेल्‍या पुरुष नक्षलवाद्यांच्या पत्‍नींचा समावेश असतो. याच महिला कमांडो नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करतात.अशी माहिती दंतेवाड्याचे पोलिस निरीक्षक अभिषेक पल्‍लव यांनी दिली.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -