घरदेश-विदेशVideo : ती आली, तिनं पाहिलं अन्‌ भर चौकात चपलेनं धोपटलं

Video : ती आली, तिनं पाहिलं अन्‌ भर चौकात चपलेनं धोपटलं

Subscribe

या व्यक्तीचा महिलेला संशय आला. पण तिने तसे न दाखविता त्याला ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच शहरातील मँगो चौकात पैसे घेण्यासाठी बोलावले.

ती आली, तिने त्याला पाहिलं आणि मग भर चौकात चपलेने धोपटलंही घटना घडलीय जमशेदपूरमध्ये. याचे कारण म्हणजे एका व्यक्तीची तोतयागिरी. झारखंडमधील जमशेदपूरच्या या व्यक्तीने संबंधित महिलेला आपण लाचलुचपतप्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगितले आणि तक्रार टाळायची असेल, तर ५० हजार रूपयांची बेगमी करावी लागेल असे सांगितले.

- Advertisement -

तथापि या व्यक्तीचा महिलेला संशय आला. पण तिने तसे न दाखविता त्याला ठरलेल्या ठिकाणी म्हणजेच शहरातील मँगो चौकात पैसे घेण्यासाठी बोलावले. तत्पूर्वी तिने पोलिसांनाही सांगून ठेवले होतेच. मग काय पैशाच्या लालसेने हा तोतया अधिकारी तिथे आला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पण पोलिसांना पाहताच आधी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याच्यावर ताबा मिळवत त्याला जेरबंद केले. त्याचवेळेस संतप्त झालेल्या या महिलेने फसवणूक करणाऱ्या या इसमाची भर रस्त्यात खेटराने पूजा केली. एएनआयने हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवर प्रसारित केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -