घरताज्या घडामोडीगँगस्टर अतिकच्या वकिलाच्या घराबाहेर बॉम्बहल्ला; परिसरातील नागरिकांमध्ये भीती

गँगस्टर अतिकच्या वकिलाच्या घराबाहेर बॉम्बहल्ला; परिसरातील नागरिकांमध्ये भीती

Subscribe

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर प्रयागराजमधून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अतीक अहमदच्या एका वकिलाच्या घराजवळ मंगळवारी क्रूड बॉम्ब फेकला गेला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांच्या हत्येनंतर प्रयागराजमधून आणखी एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. अतीक अहमदच्या एका वकिलाच्या घराजवळ मंगळवारी क्रूड बॉम्ब फेकला गेला. दोन अज्ञात व्यक्तींनी वकिलाच्या घराबाहेर तीन बॉम्ब फेकले, त्यामुळे मोठा स्फोट झाला. त्यावेळी घरात वकील दयाशंकर नव्हते.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या बॉम्बहल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, दहशत पसरवण्याच्या उद्देशाने बॉम्ब फेकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी कर्नलगंज पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. (Bombing outside gangster Atiq lawyer house in Up Prayagraj)

- Advertisement -

दयाशंकर हे हल्लेखोराचे लक्ष्य नव्हते

ज्या परिसरात दयाशंकर यांचे घर आहे, त्याच परिसरात त्यांचा एक शेजारी छोटू यादव राहतो. बॉम्ब हल्ल्याचा तपास केला असता हर्षित सोनकर याचा छेटू यादव याच्याशी पैशाच्या व्यवहारावरून वाद सुरू असल्याचे निष्पन्न झाले. पैशाच्या वादातून हर्षित सोनकरने छोटू यादवच्या घरी भांडण केले आणि नंतर बॉम्ब फेकत पळ काढला. दुर्दैवाने अतिक अहमद यांचे वकील दयाशंकर मिश्रा यांच्या घराबाहेर बॉम्बस्फोट झाले.

- Advertisement -

हेही वाचा – गँगस्टर अतिक अहमदचा मारेकरी दुसऱ्या कारागृहात हलवला, हत्येच्या तपासासाठी SIT ची स्थापना

‘अतिकचे वकील दयाशंकर मिश्रा हे लक्ष्य नव्हते आणि ही घटना दोन तरुणांमधील वैमनस्यातून घडली होती’, असे कर्नलगंज पोलिस स्टेशनचे एसएचओ राम मोहन राय म्हणाले. तसेच, भीती आणि दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा वकिलाने केला.

दहशत पसरवण्याचा हेतू

अतीक अहमदच्या हजेरीदरम्यान वकील दयाशंकर मिश्रा १३ एप्रिल रोजी सीजेएम न्यायालयात बाजू मांडण्यासाठी पोहोचले होते. ते अतीक अहमद यांच्या खटल्यांचा बराच काळ बचाव करत आहेत. बॉम्ब हल्ल्याची माहिती मिळताच दयाशंकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, घराबाहेर बॉम्ब फेकण्यामागे दहशत पसरवण्याचा हेतू असू शकतो. सोमवारी अतिक अहमदचे वकील विजय मिश्रा यांनीही त्यांच्या जीवाला धोका व्यक्त केला होता.

नेमके प्रकरण काय?

गेल्या शनिवारी रात्री माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची हत्या करण्यात आली होती. अतिक आणि त्याच्या भावाला पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी नेले असता ही हत्या करण्यात आली. या घटनेत तीन आरोपींचा समावेश होता. अतिकपर्यंत पोहोचण्यासाठी आरोपींनी स्वतःला माध्यमकर्मी असल्याचं दाखवलं. अतिक आणि त्याच्या भावाच्या हत्येनंतर या तीन आरोपींना अटक करण्यात आली होती.


हेही वाचा – अरुणाचलवर मोदी सरकारचे लक्ष केंद्रीत, चीनला उत्तर देण्यासाठी होणार बौद्ध नेत्यांचे राष्ट्रीय अधिवेशन

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -