घरदेश-विदेशLondon Indian Embassy: भारतीय दूतावासावरील हल्ल्याच्या तपासात चूक; NIA ची नामुष्की

London Indian Embassy: भारतीय दूतावासावरील हल्ल्याच्या तपासात चूक; NIA ची नामुष्की

Subscribe

गेल्या वर्षी 19 मार्च रोजी लंडनमधील भारतीय दूतावासाजवळ निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये सहभागी असलेल्या 15 संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांच्यासाठी लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे.मात्र यातील 3 जणांची ओळख चुकीची पटली आहे.

नवी दिल्ली: गेल्या वर्षी 19 मार्च रोजी लंडनमधील भारतीय दूतावासाजवळ निदर्शनांदरम्यान हिंसाचार झाला होता. यामध्ये सहभागी असलेल्या 15 संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली असून त्यांच्यासाठी लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. मात्र, आता काही महिन्यांनंतर, राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) म्हणते की, या प्रकरणात पंजाबमधील 3 लोकांची चुकीची ओळख पटली आहे. इंडियन एक्सप्रेसने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. गृह मंत्रालयाने यापूर्वी हिंसाचाराशी संबंधित व्हिडिओंवरून ओळख पटवण्यात आलेल्या 15 लोकांविरुद्ध लुक आउट परिपत्रक जारी केले होते. (Britain Indian Embassy Attack NIA Withdraws 3 lookout noticed over mistaken identify)

तपासासंदर्भात एनआयएचे पथक गेल्या वर्षी मे महिन्यात ब्रिटनला पोहोचले होते. त्यांचा उद्देश या घटनेबाबत पाकिस्तानच्या ISI शी संबंधित संशयित दहशतवादी संबंधांचा तपास करणं होता. यावेळी दूतावासावर झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आले. यामध्ये लोक लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर जमून हिंसाचार करताना दिसले. भारतात परतल्यानंतर एनआयए अधिकाऱ्यांनी 45 संशयितांचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सार्वजनिक केली होती. त्याची ओळख पटवण्यासाठी मदत करण्याचे आवाहनही करण्यात आले. याबाबत एजन्सीला सुमारे 850 फोन आले.

- Advertisement -

संशयितांची ओळख पटवण्यासाठी मदत

अहवालानुसार, रिसर्च अँड ॲनालिसिस विंग (RAW) आणि इमिग्रेशन विभागानेही ओळख पटवण्यात मदत केली. तसंच, फेशियल रेकग्निशन तंत्रज्ञानामुळे 15 पैकी काही व्यक्तींना ओळखण्यात मदत झाली. यानंतर त्यांच्याविरुद्ध एलओसी जारी करण्यात आली. एकूण 15 संशयितांपैकी 3 जणांना नुकतेच ताब्यात घेण्यात आले आणि नंतर एनआयएकडे सोपवण्यात आले. परंतु एवढा तपासानंतरही एनआयएला 19 मार्चच्या हिंसाचाराशी संबंधित असणारे ठोस पुरावे अद्यापही सापडले नाहीत. तपास पथकाने कायदेशीर पथक आणि तत्कालीन महासंचालक (एनआयए) दिनकर गुप्ता यांच्याशी चर्चा केली. यानंतर तपास यंत्रणेने चुकीची ओळख पटलेल्या लोकांविरोधातील एलओसी मागे घेण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -