घरदेश-विदेशविजयानंतर बॉक्सरने केले महिला पत्रकाराला जबरदस्ती किस

विजयानंतर बॉक्सरने केले महिला पत्रकाराला जबरदस्ती किस

Subscribe

बल्गेरियातील एका बॉक्सर खेळाडूने महिला पत्रकाराला जबरदस्ती किस केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर या खेळाडूचा विरोध केला जात आहे.

सामना जिंकला की जिंकणारा खेळाडू अत्यंत खूष असतो. जिंकण्याची मजा ही तो सर्वांमध्ये वाटत असतो. अनेकदा जिंकलेला खेळाडू मोठ्या उत्साहात असतात. अशाच एका अतिउत्साही खेळाडूने सामना जिंकल्यानंतर एका महिला पत्रकाराला किस केली आहे. कुब्रत पुलेव (Kubrat Pulev) असे या खेळाडूचे नाव आहे. या खेळाडूने जेनिफर रावलो (Jennifer Ravalo) या महिला पत्रकाराला किस केली आहे. कॅमेरा सुरु असताना या बॉक्सरने किस केली यामुळे हा प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. या घटनेची अनेकांनी नींदा केली आहे. जेनिफर ही आपली जुनी मैत्रिण असल्याचे कुब्रत याने सांगितले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे.

 किसचे द्यावे लागले स्पष्टीकरण

- Advertisement -


बॉक्सर कुब्रत पुलेव याने किस केल्यानंतर या सर्व घटनेचे स्पष्टीकरण दिले आहे. त्याच्यावर सोशल मीडियावरून टीका होत असल्याने त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंवरून या घटनेचे स्पष्टीकरण दिलं आहे. “मी महिली पत्रकाराला ओळखतो. झालेल्या समानानंतर आम्ही दोघांनी एक पार्टी केली. या पार्टीमध्ये आम्ही दोघांनी मजा केली.” असे ट्विट त्याने केले आहे. दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने अनेक लोकांनी यावर टीका केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -