घरदेश-विदेशCash Found in Ranchi: झारखंडमध्ये ईडीला सापडला नोटांचा डोंगर; मंत्री आलमगीर आलम...

Cash Found in Ranchi: झारखंडमध्ये ईडीला सापडला नोटांचा डोंगर; मंत्री आलमगीर आलम संबंधित प्रकरण

Subscribe

झारखंडमध्ये सोमवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली. या छाप्यादरम्यान झारखंड सरकारचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव कुमार लाल यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

रांची:झारखंडमध्ये सोमवारी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने मोठी कारवाई केली. या छाप्यादरम्यान झारखंड सरकारचे ग्रामविकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव कुमार लाल यांच्या घरातून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. (Cash Found in Ranchi ED found crores rupees in Jharkhand Case related to Minister Alamgir Alam)

मंत्र्यांच्या सहाय्यकाच्या घरातून कोट्यवधींची रोकड जप्त

प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला अभियंता वीरेंद्र राम याच्या प्रकरणात ईडीच्या पथकाने झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या घरातून रोख रक्कम जप्त केली आहे. जप्त करण्यात आलेल्या रोख रकमेची मोजणी सुरू आहे. ईडीने झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र राम यांना फेब्रुवारी 2023 मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली होती.

- Advertisement -

ईडीने नऊ ठिकाणी टाकले छापे

ईडीचे पथक रांचीमधील सेल सिटीसह एकूण नऊ ठिकाणी छापे टाकत आहे. सोमवारी सकाळी ईडीचे पथक सेल सिटीमधील रस्ते बांधकाम विभागाचे अभियंता विकास कुमार यांचा ठावठिकाणा शोधत आहे. तर ईडीची दुसरी टीम बरियाटू, मोरहाबादी आणि बोडिया भागात छापे टाकत आहे. तुरुंगात बंद अभियंता वीरेंद्र राम यांच्याशी संबंधित प्रकरणासंदर्भात ईडीची टीम ही कारवाई करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्यांच्या ठिकाणांवर ईडी छापे टाकत आहे त्यात काही राजकारणी आणि अधिकारी आहेत.

- Advertisement -

ग्रामविकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के राम यांच्याशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने छापे टाकले आहेत. मुख्य अभियंता वीरेंद्र के रामला फेब्रुवारी 2023 मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्याच्यावर मनी लाँड्रिंग आणि काही योजनांच्या अंमलबजावणीत अनियमितता केल्याचा आरोप होता. यानंतर सक्तवसुली संचालनालयाचे पथक वीरेंद्र के राम यांच्याकडे पोहोचले आणि त्याला अटक केली. ईडीच्या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानंतर अनेकांना अटक केली जाऊ शकते.

(हेही वाचा: Google Ads Political Party: गूगल जाहिरातींसाठी भाजपाने 100 कोटी रुपयांच्या दिल्या जाहिराती)


Edited By- Prajakta Parab 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -