घरदेश-विदेश'भाजप दंगली घडवण्याच्या मूडमध्ये आहे...'

‘भाजप दंगली घडवण्याच्या मूडमध्ये आहे…’

Subscribe

'लोकसभा निवणडुकांआधी भाजप आपल्या फायद्यासाठी देशभरात दंगली घडवू शकतं', असा घणाघाती आरोप सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केला आहे.

सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजभर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘लोकसभा निवणडुकांआधी भाजप आपल्या फायद्यासाठी देशभरात दंगली घडवू शकतं’, असा घणाघाती आरोप त्यांनी केला आहे. एका रॅलीमध्ये बोलताना त्यांनी हा आरोप केला. राजभर यांनी याआधी अनेकदा मित्रपक्ष भाजपला अडचणीत आणतील अशी वादग्रस्त वक्तव्यं केली आहेत. या पार्श्वभूमीवर राजभर यांच्या या नव्या आरोपामुळे भारतीय जनता पक्षासमोर पुन्हा एकदा अडचणी उभ्या राहण्याची शक्यता आहे. यावेळी त्यांनी अमेरिकेने दिलेल्या त्या अहवालाचा उल्लेख केला ज्यामध्ये लोकसभा निवडणुकीआधी भारतात जातीय दंगली होऊ शकतात असं सांगण्यात आलं होतं.

भाजप दंगली घणवण्याच्या मूडमध्ये

यावेळी बोलताना राजभर म्हणाले की, ‘येत्या २१ फेब्रुवारीला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन जनतेला भडकावण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सध्या भाजप दंगली घडवण्याच्या मूडमध्ये आहे. मतं मिळवण्यासाठी भाजपाचे लोक काहीही करु शकतात’. भाषणादरम्यान राजभर यांनी  हिंदू आणि मुस्लिमांना एकजूटीने राहण्याचं आवाहनही केलं. ”जातीय दंगलीत फक्त सामान्य लोकांचाच मृत्यू का होतो ? राजकीय नेते का नाही ?” असा प्रश्न याआधी राजभर यांनी विचारला होता. ‘हिंदू मुस्लिम दंगलीत एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा कधी मृत्यू झाला का? दंगलींमध्ये राजकीय नेत्यांचा मृत्यू का होत नाही? धर्माच्या नावाने भांडणं लावून फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना जिवंत जाळलं पाहिजे. त्यानंतर ते इतरांना जाळणं बंद करतीलट”, अशा परखड शब्दांत राजभर यांनी याआधीही सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

सुहेलदेव बहुजन समाज पक्षाचे अध्यक्ष- ओमप्रकाश राजभर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -