घरमनोरंजन'ठाकरे' चित्रपटाची यशस्वी घोडदौड

‘ठाकरे’ चित्रपटाची यशस्वी घोडदौड

Subscribe

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनचरित्रावर आधारीत 'ठाकरे' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरु आहे. आाता पर्यंत ठाकरे चित्रपटाने ३० कोटींची कमाई केली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ‘ठाकरे’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हीट ठरला आणि यशस्वी झाला. चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली आहे. ‘ठाकरे’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात तब्बल ३१.६० कोटींची कमाई केली आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास २३ कोटींची कमाई केली होती.

अशी झाली ठाकरे चित्रपटाची कमाई

मराठी मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांवर तयार करण्यात आलेल्या ‘ठाकरे’ चित्रपटासाठी २० कोटी खर्च करण्यात आले होते. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी या चित्रपटाचे लेखन आणि निर्मीती केली आहे. तर अभिजीत पानसे यांनी दिग्दर्शनाची धूरा सांभाळली आहे. बहुचर्चित ‘ठाकरे’ हा चित्रपट पहिल्याच दिवशी तिकीट बारीवर हिट ठरला आहे. ‘ठाकरे’ हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषांत प्रदर्शित करण्यात आला आहे. तर ठाकरे या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सहा कोटींची तर दुसऱ्या दिवशी १० कोटींची कमाई केली होती. तर तिसऱ्या दिवशी ६.९० कोटींची कमाई केल्यानंतर तीन दिवसांत २३ कोटींवर पोहोचला होता.

- Advertisement -

मणिकर्णिकाची बाजी

‘ठाकरे’ चित्रपटासोबत कंगनाचा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशी’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मणिकर्णिकामुळे ठाकरे चित्रपटाच्या कमाईवर परिणाम होईल अशी शंका होती. मात्र ठाकरे हा चित्रपट प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत आणण्यात यशस्वी ठरला आहे. मात्र कमाईच्या बाबतीत बोलायचं झाल्यास मणिकर्णिकाने बाजी मारली आहे.

- Advertisement -

मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांशीने कमवले ५० कोटी

कंगनाचा ‘मणिकर्णिका’ हिंदी, तामिळ आणि तेलगू तीन भाषांत रिलीज करण्यात आला असून ३ हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. तर ‘ठाकरे’ २ हजारपेक्षा अधिक स्क्रीनवर दाखविण्यात आला आहे. पहिल्या तीन दिवसांत कंगनाच्या ‘मणिकर्णिका’ची कमाई ४२.५५ कोटी रुपये इतकी झाली होती. तर पाच दिवसात या चित्रपटाने ५० कोटींपेक्षा अधिक कमाई करत हा चित्रपट हीट ठरला आहे.


वाचा – ‘ठाकरे’ चित्रपटाची कोटीच्या कोटी उड्डाणे!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -