घरदेश-विदेशसीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षा 4 मे ते 10 जून

सीबीएसई 10 वी, 12 वी परीक्षा 4 मे ते 10 जून

Subscribe

केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 4 मे ते 10 जूनदरम्यान या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक cbse.nic.in आणि cbse.gov.in या मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरीयाल यांनी सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा 2 फेब्रुवारीला जाहीर करण्यात येतील, असे जाहीर केले होते. त्यानुसार मंगळवारी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. दहावीच्या परीक्षा 4 मे ते 10 जूनदरम्यान तर बारावीची परीक्षा ही 4 मे ते 11 जूनदरम्यान होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्रॅक्टिकल परीक्षा मार्चमध्ये होणार असून, प्रत्येक राज्यानुसार त्या वेगवेगळ्या दिवशी घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट एप्रिलमध्ये मिळण्याची शक्यता आहे. तसेच परीक्षांचा निकाल 15 जुलैपर्यंत लागण्याची शक्यता आहे.

सीबीएसई बोर्डकडून दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहेत. कोरोनामध्ये ऑनलाईन पद्धतीने शिकवणी झाल्या असल्या तरी कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. यंदा परीक्षेचा अभ्यासक्रमही 30 टक्क्यांनी कमी केल्याने परीक्षांमध्ये 33 टक्के पर्यायी निवडीचे प्रश्न असणार आहेत. परीक्षेदरम्यान कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे.

- Advertisement -

हळूहळू कोरोनातून आपण मुक्त होत आहोत. कोरोनाचा समर्थपणे आपण सामना केला आहे. तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा देत आहे. दोन कोरोना लसी उपलब्ध असल्यामुळे घाबरु नका. परीक्षेची डेट शीट देताना आनंद होत असल्याचे रमेश पोखरियाल निशंक म्हणाले.

सीबीएसईचे वेळापत्रक कसे पाहाल?
– सीबीएसईची अधिकृत वेबसाईट www.cbse.nic.in आणि www.cbse.gov.in ला भेट द्या.
-‘Latest@CBSE’ लिंकवर क्लिक करून आपला वर्ग निवडा.
– तुमच्या वर्गाप्रमाणे दहावी किंवा बारावीचं वेळापत्रक दिसेल.
– त्यानंतर तुम्ही वेळापत्रक डाऊनलोड करू शकता किंवा सेव्ह करुन प्रिंट करू शकता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -