घरदेश-विदेशठरलं! CBSE च्या १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत २ फेब्रुवारीला होणार घोषणा

ठरलं! CBSE च्या १० वी, १२ वीच्या परीक्षांबाबत २ फेब्रुवारीला होणार घोषणा

Subscribe

CBSE च्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये असणारा संभ्रम दूर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू असताना केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांची तारीख २ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनादरम्यान ऑनलाईन शिक्षण सुरू असल्याने परीक्षा कधी घेतल्या जाणार असा संभ्रम गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांमध्येही होता. दरम्यान, केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी CBSE च्या दहावी आणि बारावीच्या परिक्षेसंदर्भात ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

- Advertisement -

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी गुरूवारी CBSE शाळांच्या मुख्यध्यापकांसोबत लाईव्ह मिटींगमध्ये यासंदर्भातील माहिती दिली. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर cbse.gov.in भेट देऊन CBSE च्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या परीक्षेचं शेड्यूल पाहता येईल. तसेच, रमेश पोखरियाल ‘निशंक’ यांनी CBSE च्या दहावी आणि बारावी परीक्षांची डेटशीट २ फेब्रुवारी २०२१ रोजी जारी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी माहिती दिली. यासह निशंक यांनी CBSE विद्यार्थ्यांच्या ४५ वर्षांच्या रिकॉर्डसना डिजिटलाईज केले. शिक्षण मंत्र्यांनी वेबिनारच्या माध्यमातून १ हजारांहून शाळांच्या मुख्यध्यापकांशी संवाद साधला. यामध्ये त्यांनी शैक्षणिक सत्र २०२१-२०२२ मधील पाठ्यपुस्तकासह शाळांच्या प्रक्रियेसंदर्भात चर्चादेखील केली.

शिक्षण मंत्र्यांनी CBSE सह अनेक शिक्षा बोर्डोत नवी शिक्षा नीती लागू करण्याच्या दिशेने कामास सुरूवात केली असून CBSE हे बोर्ड या दिशेने प्रेरणादायी ठरू शकते. नव्या शिक्षण नीतीमध्ये विद्यार्थी इयत्ता सहावीपासून vocation education शिक्षण मिळवतील, त्यामुळे सहावीच्या विद्यार्थ्यांना तेव्हापासूनच आपल्या करिअरची दिशा निश्चित करता येईल, असेही त्यांनी सांगितले. तसेच, CBSE दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ४ मेपासून सुरू होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -