घरमहाराष्ट्रनाशिकनववर्षात नाशिक शहरातील प्रवाशांना बस भाडेवाढीचे ‘गिफ्ट’

नववर्षात नाशिक शहरातील प्रवाशांना बस भाडेवाढीचे ‘गिफ्ट’

Subscribe

5% दरवाढ मंजूर, प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडे प्रस्ताव

नाशिक : नव्या वर्षात महापालिकेच्या नाशिक महानगर परिवहन लिमिटेंड कंपनीच्या ‘सिटीलिंक-कनेक्टींग नाशिक’ बससेवेने नाशिककरांना प्रवासी भाडेदरवाढीचा दणका दिला आहे. कंपनीच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत प्रवासी भाड्यात पाच टक्के दरवाढ मंजूर करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव प्रादेशिक परिवहन प्राधिकरणा(आरटीए) च्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. प्राधिकरणाने मान्यता दिल्यानंतरच ही भाडेवाढ लागू होणार आहे. यामुळे महापालिकेच्या बसभाड्यात सुमारे एक ते तीन रुपयांची वाढ होणार आहे.

सद्यस्थितीत ४२ मार्गांवर तब्बल १४८ बसेस धावत असून यापोटी प्रतिदिन सरासरी ४५ रुपये किलोमीटर याप्रमाणे उत्पन्न मिळत आहे. महापालिकेची ही बससेवा ना नफा ना तोटा तत्वावर चालविण्यासाठी प्रति बस प्रति किलोमीटर किमान ६५ ते ७० रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. मात्र प्राप्त महसुल लक्षात घेता प्रति बस प्रति किलोमीटर २० ते २५ रुपयांचा तोटा होत असल्याचे दिसत आहे. आकडेमोड करता ८ जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत सुमारे २७ कोटी रुपयांचा तोटा होवू शकतो. हा तोटा कमी करण्यासाठी कमी उत्पन्न असलेल्या मार्गांवरील बसफेजया कमी करतानाच उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचाच एक भाग म्हणून बस प्रवासी भाड्यात पाच टक्के वाढ करण्यात आली आहे. अर्थात सिटिलिंकच्या या भाडेवाढीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाची मंजुरी आवश्यक आहे. त्यामुळे भाडेवाढीचा प्रस्ताव कंपनीने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला सादर केला आहे.

नाशिक महानगर परिहवहन लिमिटेड कंपनीने दरवर्षी पाच टक्के भाडेवाढीचे धोरण यापूर्वीच मंजूर केले आहे. तसेच गेल्या काही महिन्यांत इंधनाच्या दरांतही वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवासी भाडेदरात पाच टक्के अल्पशी वाढ करण्याचा निर्णय कंपनीने संचालक मंडळाच्या बैठकीत घेतला आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या मंजुरीनंतरच त्यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.
– कैलास जाधव, आयुक्त तथा अध्यक्ष नाशिक महानगर परिवहन लिमिटेड कंपनी.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -