घरमहाराष्ट्रनाशिकविश्वस्त मंडळाच्या बेकायदेशीर कामकाजास बसेल चाप

विश्वस्त मंडळाच्या बेकायदेशीर कामकाजास बसेल चाप

Subscribe

स्वागतार्ह कामगिरी : धर्मादाय कार्यालयाकडून १५ दिवसांत तब्बल १३०४ चेंज रिपोर्ट दावे निकाली

 योगेश टिळे , नाशिक :  धर्मादाय आयुक्त कार्यालयातील प्रलंबित असलेले चेंज रिपोर्ट अर्थात बदल अर्ज जलदगतीने निकाली काढण्यासाठी नाशिक विभागाचे सहायक धर्मादाय आयुक्त जयसिंग झपाटे यांनी विशेष मोहीम राबवत १५ दिवसांत १३०४ बिनवादांचे अर्ज निकाली काढले आहे. या अभियानामुळे बेकायदा कामकाज करणार्‍यांना मोठा चाप बसणार आहे.

आतापर्यंत धर्मादाय संस्थांना पदाधिकारी बदल असो की इतर, त्यासाठी वर्षानुवर्षे चकरा माराव्या लागत होत्या. त्यानंतरही पदाला मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे पदाधिकारी बदलाच्या प्रकरणात तर अनेक संस्थांमध्ये मंजुरी न मिळाल्यामुळे बेकायदेशीर काम केले जात होते. 1950 मध्ये कायदा झाल्यापासून 1985 पर्यंत संबंधितांना कुठल्याही नोटिसा न बजावता ‘बदल अहवाल’ मंजूर केला जात होता. परंतु 1985 नंतर नोटिसा बजावून म्हणणे ऐकून घेण्याच्या प्रकारांमुळे प्रलंबित प्रकरणे वाढल्याचे या क्षेत्रातील कायदेतज्ज्ञ सांगतात.

- Advertisement -

दुसरीकडे नोटिसा बजावल्याच पाहिजेत, अन्यथा कोणीही कोणालाही कमी करून अहवाल करून घेईल, असाही एक मतप्रवाह तयार आहे. या बदला-बदलीच्या बदल अहवालांमुळे एकाच संस्थेवर दोन-दोन समांतर संचालक मंडळ कार्यरत होत आहेत. त्याचा फटका संस्थेतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना सहन करावा लागतो. राज्याचे धर्मादाय आयुक्त प्रमोद तरारे यांनी चेंज रिपोर्टचे दावे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश दिले. त्यानूसार नाशिक धर्मादाय आयुक्त कार्यालयाने १३ डिसेंबर ते ३० डिसेंबर दरम्यान पंधरा दिवसांची विशेष मोहिम राबवत नाशिक, धुळे, जळगांव, नंदुरबार जिल्हयातील १३०४ दावे निकाली काढले या मोहिमेचा संस्थांना मोठा फायदा होणार आहे.

काय असतो चेंज रिपोर्ट?

धर्मदायी संस्थांवरील विश्वस्त किंवा कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया ठरावीक काळानंतर येणारया संस्थेला पार पाडावी लागते. निवडणुकीनंतर येणारया नव्या संचालकांच्या नावांची यादी संस्थेने धर्मादाय आयुक्तांच्या दफ्तरी नोंद करून घेण्यासाठी सादर केली जातात. कार्यरत मंडळातील पदाधिकारी, सदस्याने राजीनामा दिला, मृत झाले. त्यांच्या रिक्त जागी नव्याची झालेली निवड यांची माहिती धर्मादाय आयुक्त कार्यालयाला कळवणे संबंधित संस्थेस बंधनकारक असते. या प्रक्रियेला चेंज रिपोर्ट असे म्हणतात. त्याला सहायक धर्मादाय आयुक्तांकडून मंजुरी मिळवावी लागते.

चेंज रिपोर्टचे प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली. अनेकदा संस्था, ट्रस्ट याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, या मोहिमेद्वारे मोठ्या प्रमाणावर दावे निकाली काढण्यात आले. यात सहायक धर्मादाय आयुक्त राम लिपते, रोहिणी थोरात, धर्मादाय उपायुक्त कांचन सुपाते यांचे सहकार्य लाभले.      -जयसिंग झपाटे, सह. धर्मादाय आयुक्त, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -