घरदेश-विदेशऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारचा दिलासा

Subscribe

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने साखर निर्यातीसाठी अनुदान देण्याचा निर्णय दिला आहे. यावर्षी देशभरातील विविध भागांमध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडूवन ऊस उत्पादकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला गेला आहे. एकूण ६० लाख मॅट्रिक टन साखरेच्या निर्यातीवर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. केंद्र मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात केंद्रिय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी माहिती दिला. त्याचबरोबर शेतकऱ्यासांठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे ६ हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती देखील प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

सरकार देशभरात आणखी ७५ मेडीकल कॉलेज काढणार

केंद्रीय मंत्रीमंडळात झालेल्या बैठकीत मेडीकल शिक्षणासंदर्भात अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. अनेक वेळा विद्यार्थ्यांना मेहनत करुनही सरकारच्या मेडीकल कॉलेजमध्ये शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार आणखी ७५ मेडीकल कॉलेज देशभरात सुरु करणार आहे.

केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय

  • देशभरात ७५ वैद्यकीय महाविद्यालय उघडणार
  • ऊस उत्पादन शेतकऱ्यांसाठी साखरेच्या ६० लाख मॅट्रिक टनपर्यंतच्या निर्यातीसाठी अनुदान
  • आपत्तींचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन करण्याची तयारी
  • देशात अधिकाअधिक गुंतवणूक आणता यावी यासाठी प्रयत्न
  • लहान-मोठ्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिगमध्ये १०० टक्के एफडीआयला मान्यता
  • प्रिंट मीडियाप्रमाणेच डिझिटल मीडियामध्येही २६ टक्के गुंतवणुकीला मान्यता
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -