घरदेश-विदेशभाजप सरकारनं जाहिरांतींवर खर्च केले ५,२०० कोटी

भाजप सरकारनं जाहिरांतींवर खर्च केले ५,२०० कोटी

Subscribe

२०१४ पासून सरकारनं जाहिरातींवर किती खर्च केला? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. त्याला आता माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लेखी उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये त्यांनी सरकारनं २०१४ सालापासून जाहिरांवर ५,२०० कोटी रूपये खर्च केल्याची माहिती दिली आहे.

हे सरकार केवळ जाहिरात बाजी करतं. कामाचा मात्रा काही पत्ता नाही अशी टिका नेहमीच विरोधकांकडून नेहमीच केली जाते. दरम्यान, २०१४ पासून सरकारनं जाहिरातींवर किती खर्च केला? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. त्याला आता माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लेखी उत्तर दिलं आहे. या उत्तरामध्ये त्यांनी सरकारनं २०१४ सालापासून जाहिरांवर ५,२०० कोटी रूपये खर्च केल्याची माहिती दिली आहे. यामध्ये टिव्ही, पेपर, डिजीटल जाहिरातींवर किती खर्च केला याची माहिती देण्यात आली आहे. २०१४ – १५ साली ९७९.७८ कोटी, २०१५ – १६ साली १,१६०.१६ कोटी रूपये, २०१६- १७ साली १,२६४.२६ कोटी रूपये, २०१७ – १८ साली १,३१३ कोटी रूपये तर, डिसेंबर २०१८ साला पर्यंत ५२७.९६ कोटी रूपये खर्च ेकेल्याची माहिती यावेळी राज्यवर्धन राठोड यांनी दिली. हा सारा आकडा ५,२४५.७३ कोटी रूपये होतो.

वाचा – जाहिरातींमध्ये भाजप अव्वल

यामध्ये गाणी, नाटक आदी माध्यमातून देखील जाहिरातबाजी केलेली आहे. सरकारनं केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारनं आत्तापर्यत हजारो रूपये खर्च केल्याचं सरकारनंच दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देखील भाजपनं जोरदार प्रचार केला होता. त्यासाठी विविध माध्यमांमध्ये जाहिरातबाजी देखील करण्यात आली होती. पण, सर्वांच्या लक्षात राहिली ती ‘अच्छे दिन’ची जाहिरात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -