घरदेश-विदेशजाहिरातींमध्ये भाजप अव्वल

जाहिरातींमध्ये भाजप अव्वल

Subscribe

निवडणुका आल्या की जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. मागील आठड्यात भाजपाच्या २२ हजार ९९ जाहिराती दिसल्या असल्याचा अहवाल बीएआरसी प्रकाशित केला आहे.

निवडणुका आल्या की जाहिराती मोठ्या प्रमाणावर केल्या जातात. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचारासाठी भाजपानेही जाहिरांतीचा आधार घेतला आहे. भाजपाने टीव्हीवर केलेल्या जाहिरातींनी मोठमोठाल्या कंपन्यांना मागे टाकले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात ही बाबसमोर आली आहे. हा अहवाल ब्राॅडकास्ट ऑडिसन्स रिसर्च (बीएआरसी) ने हा अहवाल प्रकाशित केला. बीएसआसी प्रत्येक आठवड्यात प्रकाशित झालेल्या जाहिरांतींची नोद ठेवते. बीएआसीने १६ नोव्हेंबर रोजी हा अहवाल प्रकाशित केला. त्यामागील आठवड्यात या यादीत विमल पान मसाला ही जाहिरात अव्वल होती. मागील आठड्यात भाजपाच्या २२ हजार ९९ जाहिराती दिसल्या. या माहितीनंतर विरोधी पक्ष आता पुन्हा एकदा भाजपला घेणार आहे. मागील अनेकवेळा विरोधकांनी जाहिरातीवरून भाजपावर अनेक टीका केल्या होत्या. सरकारच्या जाहिराती या खोट्या असतात असा आरोपही लावला. मात्र तरीही निवडणूकीदरम्यान भाजप जाहिरात प्रदर्शन करत आहे. या जाहिरांमध्ये भाजपने केलेल्या कामाचा आढावा दिला जात असल्याचे भाजपा नेता म्हणत आहेत. तसेच जनतेसमोर आपण केलेल्या कामाची माहिती देण्यासाठी जाहिराती हा एक उत्तम पर्याय असल्याने जाहिरातीवर भर दिला जात असल्याचे चित्र आहे.

बीएआरसी यादीत नेटफ्लिक्सही सामील

ब्राॅडकास्ट ऑडिसन्स रिसर्च ने प्राकाशित केलेल्या यादीत आठवड्याभरात नेटफ्लिक्सने १२ हजार ९५१ आणि ट्रिवॅगोने १२ हजार ७९५ वेळा जाहिराती  प्रसारित केल्या. हे दोन्ही ब्रान्ड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत. काँग्रेस या यादीत पहिल्या दहामध्ये ही नाही. संतूर सँडल अॅण्ड टर्मरिक, डेटॉल लिक्विड सोप, वाईप, कोलगेट डेन्टल क्रिम, डेटॉल टॉयलेट सोप्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ, रुप मंत्रा आयुर फेस क्रिम यांचा क्रमांक लागतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -