घरदेश-विदेशमंकीपॉक्स रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स, वाचा...

मंकीपॉक्स रुग्णांसाठी केंद्र सरकारच्या नव्या गाइडलाइन्स, वाचा…

Subscribe

कोरोनानंतर जगभरात आता मंकीपॉक्स आजाराने थैमान घातले आहे. या आजाराने नागरिकांच्या मनात देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यात भारतात मंकीपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारने नवीन गाइडलाइन्स जारी केल्या आहेत.

या गाइडलाइन्सनुसार, मंकीपॉक्स रूग्ण आणि त्यांच्या संपर्कातील लोकांना आता 21 दिवसांसाठी आयसोलेशनमध्ये राहवे लागणार आहे. तसेच मंकीपॉक्स बाधितांना मास्क घालणे, हाताची स्वच्छता पाळणे आणि जखमा पूर्णपणे झाकून ठेवणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे. यासोबतच रुग्ण पूर्णपणे बरे होईपर्यंत म्हणजे नॉर्मल जीवन असल्याप्रमाणे जगत नाही तोपर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे यात म्हटले आहे.

- Advertisement -

सरकारच्या या गाइडलाइन्सनुसार, रुग्णास सर्व जखमा बऱ्या होईपर्यंत आणि खरुज पूर्णपणे गळून पडेपर्यंत आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींबाबत एका अधिकाऱ्याने सांगितले की, जो व्यक्ती रुग्णाच्या थेट संपर्कात येतो किंवा संक्रमित व्यक्तीशी थेट शारीरिक संपर्कात येतो, याशिवाय कपडे, अंथरूण यासारख्या दूषित सामग्रीच्या संपर्कात येतो, त्याला प्राथमिक संपर्क मानले जावे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना त्यांच्या लक्षणांचे स्वतः निरीक्षण करण्यास आणि जिल्हा पातळीवरील पथकांच्या संपर्कात राहण्यास सांगितले आहे. संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला वेगळ्या खोलीत रहावे. मास्क वापरावा. या लोकांनी सुरक्षित शारीरिक अंतर पाळताना वेळोवेळी हात स्वच्छ करत राहावे. याशिवाय संपर्कात असलेल्या व्यक्तींनी निरीक्षणादरम्यान रक्त, पेशी, ऊती, अवयव किंवा वीर्य दान करू नये.

- Advertisement -

यापूर्वी देशाची राजधानी दिल्लीमध्ये मंकीपॉक्सचे प्रकरण समोर आले होते, त्यामुळे देशात या आजाराच्या रुग्णांची संख्या चार झाली आहे. मंकीपॉक्स संसर्ग सामान्यतः ताप, डोकेदुखी, तीन आठवड्यांपर्यंत पुरळ, घसा खवखवणे, खोकला आणि लिम्फ नोड्स सुजणे यांसारखी लक्षणं आढळतात. या लक्षणांमध्ये शरीरावर फोड येतात, जे साधारणपणे ताप सुरू झाल्यानंतर एक ते तीन दिवसात दिसतात. हे व्रण साधारण दोन ते चार आठवडे टिकतात. या दरम्यान शरीरावर खाज सुटते आणि खूप वेदना होतात.


मुख्यमंत्र्यांचे निर्णय दिल्लीत होतात, आपण काय करणार; शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावर अजित पवारांची टीका


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -