घरमहाराष्ट्र'मुख्यमंत्री वॉर रूम-पायाभूत सुविधा प्रकल्पां'च्या महासंचालकपदी मोपलवारांची नियुक्ती

‘मुख्यमंत्री वॉर रूम-पायाभूत सुविधा प्रकल्पां’च्या महासंचालकपदी मोपलवारांची नियुक्ती

Subscribe

मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची वॉर रूम-पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर महिन्याभरातच ही एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे.

राधेश्याम मोपलवार हे २८ फेब्रुवारी २०१८ रोजी निवृत्त झाल्यानंतर लगेचच त्यांना एक वर्षाकरिता करार पद्धतीने राज्य रस्ते विकास महामंडळाचे अवर उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेमण्यात आले होते. तर, यावर्षी मार्च महिन्यात राधेश्याम मोपलवार यांना राज्य रस्ते विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदावर सातव्यांदा मुदतवाढ देण्यात आली. मोपलवार यांना ही मुदतवाढ सहा महिन्यासाठी देण्यात आली असून ही मुदत पुढील महिन्यात ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण होत आहे. फडणवीस आणि ठाकरे सरकारमध्ये सलग सातवेळा विक्रमी मुदतवाढ मिळालेले मोपलवार हे पहिलेच अधिकारी असावेत.

- Advertisement -

हेही वाचा – पोलीस गृहनिर्माण योजनेला निधी कमी पडू दिला जाणार नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर ते मुंबई हा ७०० किलोमीटरचा समृद्धी महामार्ग आहे. त्यापैकी नागपूर ते शिर्डी ५२० किलोमीटरचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यातही ४५५ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून महिन्याला २० किलोमीटरचे काम अंतिम टप्प्यात येत आहे. त्याचीही जबाबदारी सेवानिवृत्त सनदी अधिकारी मोपलवार यांच्याकडे आहे.

- Advertisement -

राज्य शासनाचे अनेक पायाभूत प्रकल्प कार्यान्वित असून अनेक नवनवीन मोठे प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. या सर्व प्रकल्पांच्या वेगवान आणि योजनाबद्ध अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री सचिवालयात वॉर रूमचे पुनरुज्जीवन करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मोपलवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा – ईडीचे सर्व अधिकार अबाधित, ‘ती’ याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -