घरदेश-विदेशभारताचे चांद्रयान-२, चंद्राकडे १५ जुलै रोजी झेपावणार!

भारताचे चांद्रयान-२, चंद्राकडे १५ जुलै रोजी झेपावणार!

Subscribe

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम, चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. 15 जुलै रोजी पहाटे 2 वाजून 51 मिनिटांनी चांद्रयान-2 चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे. यासंदर्भातील माहिती इस्रोचे प्रमुख डॉ. के. सिवान यांनी दिली आहे. तब्बल दहा वर्षांनी भारताचे हे चांद्रयान पुन्हा चंद्राच्या दिशेने झेपावणार असून चंद्रावर जाणार्‍या चांद्रयान-2 ची काही छायाचित्रे इस्रोने प्रसारित केली आहेत.

चांद्रयान-2 मोहिमेसाठी तीन मॉड्युल्स तयार करण्यात आले आहेत. यामध्ये एक ऑर्बिटर, लँडर आणि एका रोव्हरचा समावेश आहे. त्यांना लाँच व्हेइकल जीएसएलव्ही एमके -३ अंतराळात घेऊन जाईल. विशेष म्हणजे हे लाँच व्हेइकल भारतातच बनवण्यात आले आह

- Advertisement -

चांद्रयान-2 च्या लँडरला विक्रम आणि रोव्हरला प्रज्ञान नाव देण्यात आले आहे. रोव्हर प्रज्ञानला लँडर विक्रमच्या आत ठेवण्यात येईल. तसेच चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रमचे लँडिंग झाल्यानंतर त्याला बाहेर आणले जाईल.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार ऑर्बिटर मोहिमेदरम्यान चंद्राभोवती भ्रमण करणार आहे. नंतर हे ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. चंद्राच्या पृष्टभागावर पोहोचल्यानंतर सहा चाके असलेला प्रज्ञान नाव असलेला रोव्हर पृष्टभागावर उतरेल. इस्रोचे शास्रज्ञ पृथ्वीवरून या रोव्हरचे नियंत्रण करणार आहेत. भारताच्या चांद्रमोहिमेला पुढे घेऊन जाण्याबरोबरच चांद्रयान-2 अंतराळ संस्थांची मदत देखील करणार आहे.

- Advertisement -

भारताने 2009 मध्ये चांद्रयान-1 चंद्रावर पाठवले होते. मात्र त्यामध्ये रोव्हरचा समावेश नव्हता. आता दहा वर्षांनंतर दुसर्‍यांदा भारताने चांद्र मोहीम हाती घेतली असून, चांद्रयान-2 चे आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपण होणार आहे.

असे उतरणार यान चंद्रावर
लँडरला ऑर्बिटरच्यावरती ठेवण्यात येईल. लँडर, ऑर्बिटर आणि रोव्हरला एकत्रितपणे कम्पोझिट बॉडी असे संबोधण्यात आले आहे. या कंपोझिट बॉडीला जीएसएलव्ही एके-३ लॉन्च व्हेईकलमध्ये गरम आवरणामध्ये ठेवण्यात येईल. 15 जुलैला यानाचे प्रत्यक्ष प्रक्षेपण झाल्यानंतर जीएसएलव्ही एके-३ मधून कम्पोझिट बॉडीला बाहेर ढकलले जाईल. त्यानंतर कम्पोझिट बॉडीच्या खालच्या भागातून इंधनाचे ज्वलन सुरु झाल्यानंतर ही बॉडी चंद्राच्या दिशेने झेपावेल. त्यानंतर काही दिवसांनी ती चंद्राच्या कक्षेत पोहोचेल. त्यानंतर योग्य वेळी लँडर ऑर्बिटरपासून वेगळा होईल, त्यानंतर लँडर चंद्रापासून 30 किमी अंतरावरील कक्षेत 4 दिवस फिरत राहिल. प्रत्यक्ष चंद्रावर लँडिगच्या दिवशी लँडरची प्रोपल्शन सिस्टिम त्याचा वेग कमी करेल आणि लँडरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवेल. या प्रक्रियेसाठी सुमारे 15 मिनिटांचा वेळ लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -