घरमहाराष्ट्रप्रियकरावर विषप्रयोग करणार्‍या प्रेयसीला आजन्म कारावास

प्रियकरावर विषप्रयोग करणार्‍या प्रेयसीला आजन्म कारावास

Subscribe

दुधी हलव्यातून दिले विष

आपल्या प्रियकरावर विषप्रयोग करून त्याला ठार मारणार्‍या नीता कुलकर्णीला अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.आसमार यांनी मंगळवारी आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. नीताने आपला प्रियकर छगन टिकारामजी सोळंकी याच्यावर विषप्रयोग केला होता, त्यात त्याचा मृत्यू झाला होता.

छगन टिकारामजी सोळंकी आणि नीता कुलकर्णी यांचे प्रेमसंबध होते. नीताने छगनकडून अनेकदा पैसेही घेतले होते. छगनने नीताकडे लग्नासाठी तगादा लावला होता. मात्र नीता लग्नास नकार देत होती. नीताने छगनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. छगनला घेऊन ती अलिबाग तालुक्यातील रांजणपाडा येथील साई मंदिराजवळ आली. तिथे घरातून विष टाकून आणलेला दुधी हलवा त्याला खायला दिला. छगनने हा हलवा खायला नकार दिला. मात्र नीताने बळजबरीने छगनला विषारी दुधी हलवा खाण्यास भाग पाडले. त्यात त्याचा मृत्यू झाला.

- Advertisement -

या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. आसमार यांच्या न्यायालयात सुरू होती. छगन याने विषप्रयोगाच्या वेळी संशय आल्याने या घटनेचे मोबाईलमध्ये छायाचित्रण केले होते. ते सुनावणीच्या वेळी पुरावा म्हणून महत्वपूर्ण ठरले. फियार्दी पक्षातर्फे सुरुवातीला अ‍ॅड. अश्विनी बांदिवडेकर पाटील तर नंतर अ‍ॅड. अमित देशमुख यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने अ‍ॅड. अमित देशमुख यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला. छगनवर विषप्रयोग करून ठार मारल्या प्रकरणी नीता कुलकर्णी हिला दोषी ठरविले, तिला आजन्म कारावास तसेच सात वर्षे सश्रम आणि ५ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -