घरदेश-विदेशचांद्रयान २ ने भेदल्या चार कक्षा; फक्त तीन कक्षा बाकी

चांद्रयान २ ने भेदल्या चार कक्षा; फक्त तीन कक्षा बाकी

Subscribe

चंद्रावर पोहण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर इस्त्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

इस्त्रोने चंद्रावर पाठवलेले चांद्रयान २ चंद्राच्या दिशेने जवळ जवळ मार्गक्रमण करत आहे. हे चांद्रयान २ चंद्राच्या आणखी जवळ पोहोचले आहे. २ सप्टेंबर रोजी चांद्रयानापासून लँडर विक्रम यशस्वीरित्या वेगळं झाले आहे. चंद्रावर पोहण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे पार केल्यानंतर इस्त्रोने चंद्रावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे. आतापर्यंत चांद्रयान २ने चार चक्रव्यूह म्हणजे कक्षा भेदली असून आता फक्त तीन कक्षा बाकी आहे.

- Advertisement -

सोमवारी १२ वाजून ४५ मिनिटे ते १ वाजून ४५ मिनिटे या काळात विक्रम लँडर मुख्य यानापासून वेगळं करण्यात येणार होतं. त्यानुसार ते वेगळं करण्यात देखील आलं आणि त्यानंतर ते चंद्राच्या दिशेने आणखी जवळ पोहोचलं आहे. या सर्व प्रक्रियेची माहिती इस्त्रोने ट्विट करून दिली.

- Advertisement -

यासह २० ऑगस्ट रोजी चांद्रयान २ यशस्वीरित्या कामकाज करत चंद्राच्या कक्षेत दाखल झाल्याची माहितीही इस्त्रोने दिली होती. ७ सप्टेंबर रोजी रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी विक्रम चंद्राच्या पृष्ठभागावर लँड करणार असून चांद्रयान हे दक्षिण ध्रुवावर उतरणार असल्याचा संदेश चांद्रयानकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -