घरदेश-विदेश'भारताने काश्मीर मुद्द्यावरुन युद्धाची बीज रोवली आहे'

‘भारताने काश्मीर मुद्द्यावरुन युद्धाची बीज रोवली आहे’

Subscribe

भारत हा पाकिस्तावर हल्ला करून कमजोर करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला त्यांना सांगायचे आहे की, शस्त्र आणि आर्थिक ताकदीवर युद्ध फक्त लढले जात नाही तर त्या युद्धामध्ये देशभक्ती सुद्धा असते, असं असीफ गफूर म्हणाले.

भारताने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तान खवळला आहे. त्यामुळे पाकिस्तान सतत भारताविरोधात कारवया आणि वक्तव्ये करत आहेत. काश्मीरमधील परिस्थिती प्रदेशासाठी धोकादायक आहे. तसंच भारताने जम्मू-काश्मीर विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द करुन युद्धाची बीज रोवली आहेत, असं पाकिस्तानी लष्काराने म्हटलं आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी भारतावर असा आरोप केली आहे की, भारताच्या या कृतीतून युद्धाची बीज रोवली जात आहे.

पुढे ते असं म्हणाले की, आमच्यावर भारत हल्ला करून कमजोर करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हाला त्यांना सांगायचं आहे की, शस्त्र आणि आर्थिक ताकदीवर युद्ध फक्त लढले जात नाही तर त्या युद्धामध्ये देशभक्ती सुद्धा असते. तसेच प्रदेशात शांतता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानची सशस्त्रे दले प्रयत्न करत आहेत. मात्र, भारताने कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन केले तर त्याला ठोस प्रत्यत्तर दिले जाईल, असं असीफ गफूर म्हणाले.

- Advertisement -

आम्ही पहिल्यांदा अण्वस्त्राचा वापर न करण्याबद्दल कुठलेही धोरण ठरवलेल नाही. फक्त बचाव करण्यासाठी अण्वस्त्राची निर्मिती केली आहे, असं गफूर म्हणाले. सोमवारी एका कार्यक्रमात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतविरोधात पाकिस्तान प्रथम अणवस्त्त्रांचा वापर करणार नसल्याचे बोले होते. तसेच भारताचे पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये ३७० कलम लागू करावे. तसेच काश्मीरमधून संचारबंदी उठवावी आणि सैन्य देखील मागे घ्यावे, अशी मागणी इम्रान खान यांनी भारताला केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -