घरदेश-विदेशChandrayaan-3 Mission: इतिहास रचल्यानंतर चांद्रयान कसे कार्य करेल? जाणून घ्या सविस्तर

Chandrayaan-3 Mission: इतिहास रचल्यानंतर चांद्रयान कसे कार्य करेल? जाणून घ्या सविस्तर

Subscribe

चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारताची प्रतिष्ठा तर वाढलीच पण या मोहिमेचे अनेक फायदा होणार आहेत. चंद्रावरील पाण्याचा शोध लावण्यापासून ते तिथल्या मातीच्या तपासणीपर्यंत सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे.

चांद्रयान-३ च्या सॉफ्ट लँडिंगमुळे भारताची प्रतिष्ठा तर वाढलीच पण या मोहिमेचे अनेक फायदा होणार आहेत. चंद्रावरील पाण्याचा शोध लावण्यापासून ते तिथल्या मातीच्या तपासणीपर्यंत सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला मिळणार आहे. भारतानं यापूर्वी चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत 2019 मध्ये चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. (Chandrayaan 3 ISRO Mission How will Chandrayaan perform after making history Know in detail)

चांद्रयानच्या लँडिंगनंतर चंद्रावर काय करणार? कशी माहिती मिळवणार? हे जाणून घेणे आवश्यक आहे. यशस्वी लँडिंगनंतर प्रज्ञान रोव्हर चंद्रावर 14 दिवस काम करणार आहे. रोव्हरवरील अनेक कॅमेऱ्यांच्या मदतीने चंद्राची छायाचित्र टिपली जाणार आहेत.

- Advertisement -

चांद्रयान-३ चे सॉफ्ट लँडिंग करण्यात आले आहे. सॉफ्ट लँडिंगनंतर, प्रज्ञान रोव्हरवर पाठवलेल्या तीन पेलोडपैकी पहिला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील माती आणि खडकांचा अभ्यास करेल. त्याच वेळी, दुसरा पेलोड रासायनिक पदार्थ आणि खनिजांचा अभ्यास आणि निरीक्षण करेल.

तसेच, दुसरा पेलोड रासायनिक पदार्थ आणि खनिजांच्या बदलत्या स्वरूपाची तपासणी करेल. त्याच वेळी, तिसरा पेलोड चंद्रावर जीवनाची शक्यता काय आणि किती आहे हे पाहणार. त्याचे पृथ्वीशी काही साम्य आहे की नाही, याविषयी अधिकची माहिती घेणार.

- Advertisement -

चांद्रयानाबाबत, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह म्हणाले की, चांद्रयान-3 चे निष्कर्ष आणि इनपुटचा संपूर्ण जगाला फायदा होणार आहे. डॉक्टर जितेंद्र म्हणाले की, चंद्राच्या कक्षेत अंतराळयान यशस्वीपणे पार करण्यासाठी मिशन मून अतिशय अचूकपणे आखण्यात आलं होतं.

भारताने यापूर्वी चांद्रयान-2 मोहिमेअंतर्गत 2019 मध्ये चंद्रावर लँडर उतरवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, शेवटच्या क्षणी लँडरशी संपर्क तुटला आणि तो क्रॅश-लँड झाला होता.

यावेळी यशस्वी लँडिंगसाठी इस्रोने अनेक अतिरिक्त खबरदारी घेतली होती. इस्रो प्रमुखांनी नुकतेच सांगितले होते की लँडिंगचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे लँडरचा वेग कमी करून चंद्रावर 30 किमी उंचीवरून सॉफ्ट लँडिंग करणे.

( हेही वाचा: ‘इंडिया ऑन द मून’ चंद्रावर पाऊल ठेवताच ISRO प्रमुखांनी दिली पंतप्रधानांना माहिती )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -