घरदेश-विदेशChandrayaan 4: ISRO प्रमुखांनी दिली चांद्रयान 4 बाबत अपडेट; म्हणाले, मोदींचं टार्गेट

Chandrayaan 4: ISRO प्रमुखांनी दिली चांद्रयान 4 बाबत अपडेट; म्हणाले, मोदींचं टार्गेट

Subscribe

एस सोमनाथ यांनी माहिती दिली की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2040 च्या दशकाच्या सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला उतरवण्याचे ध्येय ठेवले आहे.

नवी दिल्ली: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) प्रमुख एस सोमनाथ यांनी चांद्रयान-4 बाबत मोठे अपडेट दिले आहेत. हे मिशन विकासाच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अंतराळ संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून देश वेगाने प्रगतीच्या मार्गावर असल्याचे ते म्हणाले. येथील सतपाल मित्तल शाळेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर सोमनाथ यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. इस्रो आपल्या चंद्र मोहिमेसाठी कटिबद्ध असल्याचे डॉ.सोमनाथ यांनी सांगितले. (Chandrayaan 4 ISRO chief gives update on Chandrayaan 4 Said Narendra Modi s target)

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2040 च्या दशकाच्या सुरुवातीला चंद्राच्या पृष्ठभागावर मानवाला उतरवण्याचे ध्येय ठेवले आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताची चंद्र मोहीम चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरली होती.

- Advertisement -

चांद्रयान-3 टीमला पुरस्कार (Update about Chandrayaan 4)

भारताच्या चांद्रयान-3 मिशन टीमला अंतराळ संशोधनासाठी प्रतिष्ठित 2024 जॉन एल. जॅक स्विगर्ट जूनियर पुरस्कार मिळाला आहे. कोलोरॅडो येथील वार्षिक स्पेस सिम्पोजियमच्या उद्घाटन समारंभात ह्यूस्टनमधील भारताचे महावाणिज्यदूत डीसी मंजुनाथ यांनी सोमवारी इस्रोच्यावतीने हा पुरस्कार स्वीकारला.

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे पहिले राष्ट्र म्हणून, इस्रोने विकसित केलेले चांद्रयान-3 मिशन मानवजातीच्या अंतराळ संशोधन आकांक्षांना समजून घेण्यासाठी आणि सहकार्यासाठी नवीन क्षेत्रांमध्ये विस्तारित करते, असे स्पेस फाउंडेशनने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

“अंतराळातील भारताचे नेतृत्व जगासाठी प्रेरणादायी आहे,” असे स्पेस फाउंडेशनच्या सीईओ हीथर प्रिंगल यांनी जानेवारीमध्ये पुरस्कार जाहीर करताना एका निवेदनात म्हटले होते. अवकाश संशोधनाचा स्तर पुन्हा उंचावला आहे.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारताने मिशन चांद्रयान-3 अंतर्गत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरित्या ‘सॉफ्ट लँडिंग’ करून इतिहास रचला होता आणि भारत चंद्राच्या या प्रदेशावर उतरणारा जगातील पहिला देश बनला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -