घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअभिनेता गोविंदा त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक

अभिनेता गोविंदा त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक

Subscribe

बॉलिवूड अभिनेते माजी खासदार गोविंदा अहुजा यांनी आज भगवान त्र्यंबकेश्वर चरणी नतमस्तक होत आशिर्वाद घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे बंधू किर्ती, मुलगा यश उपस्थित होते. काही दिवसांपूर्वीच गोविंदाने राजकारणत री-एन्ट्री करत शिंदेसेनेत प्रवेश केला.

गोविंदा यांना मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे बोलले जाते मात्र नाशिक भेटीत त्यांनी याबाबत बोलणे टाळले. गोविंदा यांनी २००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या राम नाईक यांचा पराभव केल्याने एकच चर्चा झाली होती. आता पुन्हा एकदा गोविंदा राजकारणाच्या प्रवेशासाठी सज्ज झाल्याचे पहायला मिळते. दरम्यान त्र्यंबकेश्वर देवस्थानच्यावतीने गोविंदाचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्र्यंबक देवस्थानचे अध्यक्ष कैलास घुले, विश्वस्त नितीन जीवने, पुरूषोत्तम कडलग, सत्यप्रिय शुक्ल, स्वप्निल शेलार, रूपाली भुतडा आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -