घरElection 2023Chhattisgarh CM : विष्णूदेव साय बनणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री; राजस्थान, MP बाबत खलबतं सुरूच

Chhattisgarh CM : विष्णूदेव साय बनणार छत्तीसगडचे मुख्यमंत्री; राजस्थान, MP बाबत खलबतं सुरूच

Subscribe

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आदिवासी नेते विष्णूदेव साय यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केल्याचे विविध खासगी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पुढे येत आहे. आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साय यांची नेतेपदी निवड करण्यात आली.

रायपूर : पाच राज्यांपैकी तीन राज्यात भाजपने विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे. अशातच आज रविवारी (10 डिसेंबर) झालेल्या भाजपच्या बैठकीत विष्णूदेव साय यांच्या नावाला पसंती दिली आहे. तेव्हा छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री विष्णूदेव साय बनणार आहेत. असे जरी असले तरी राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये अद्यापही मुख्यमंत्री पदाबाबत खलबतंच सुरू असल्याचे दिसून येत आहे. (Chhattisgarh CM Vishnudev Sai to become Chief Minister of Chhattisgarh Harassment continues regarding Rajasthan MP)

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने आदिवासी नेते विष्णूदेव साय यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केल्याचे विविध खासगी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून पुढे येत आहे. आज झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साय यांची नेतेपदी निवड करण्यात आली. साय छत्तीसगडच्या कुंकुरी विधानसभेतून निवडून आले आहेत. राज्यात आदिवासी समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. साय आदिवासी समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांच्यानंतर साय हे आदिवासी समाजातील दुसरे मुख्यमंत्री बनणार आहेत.

- Advertisement -

मुख्यमंत्री पदासाठी कोणाचाही चेहरा नव्हता केला समोर

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मुख्यमंत्री पदासाठी कोणाचाही चेहरा पुढे केला नव्हता. संपूर्ण निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढविण्यात आली होती. मात्र विजयानंतर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत रायपूरपासून दिल्लीपर्यंत आठवडाभर चर्चा सुरू होती. आता या शर्यतीत आदिवासी समाजातील विष्णूदेव साय यांच्या नावाला पक्षाने मान्यता दिली आहे.

- Advertisement -

हेही वाचा : AYODHYA RAM MANDIR: मोदींनी मंदिर बांधलं आणि तारीखही सांगितली; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

विष्णूदेव साय यांची राजकीय कारकीर्द

छत्तीसगडचे मुख्यमंत्री बनणारे विष्णूदेव साय यांच्या राजकीय कारकीर्दीवर नजर टाकणे गरजेचे आहे. साय यांनी 1989 पासून राजकारणाला सुरुवात केली. विष्णूदेव साय हे छत्तीसगडच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. कारण ते चार वेळा खासदार, दोनदा आमदार, दोनदा केंद्रीय राज्यमंत्री आणि दोनदा प्रदेशाध्यक्ष राहिले आहेत. यासोबतच त्यांना मंत्रिमंडळात काम करण्याचाही प्रदीर्घ अनुभव आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी कुंकुरीची जागा जिंकली आहे. प्रदेशाध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतरही ते सातत्याने पक्षाशी जोडले गेले. साय यांनी 1989 मध्ये राजकीय प्रवासाला सुरुवात केली. ते संघाशी संबंधित होते. 1990 मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्यांना तापकरा विधानसभा मतदारसंघातून आमदारकीचे तिकीट दिले, त्यात ते विजयी झाले. यानंतर ते रायगड लोकसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले. 1999 ते 2014 पर्यंत ते सलग तीन वेळा खासदार होते.

हेही वाचा : Maratha Reservation: फडणवीसांच्या ताटात जेवणारी माणसं बरळतायत; जरांगेंचा दावा

मोदी गॅरंटी अंतर्गंत दिलेले आश्वासने पूर्ण करू

छत्तीसगडचे नवे मुख्यमंत्री बनल्यावर विष्णुदेव साय म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून आम्ही निवडणूक जाहीरनाम्यात दिलेली ‘मोदी गॅरंटी’ अंतर्गत जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यास आमचे प्राधान्य असेल. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 18 लाख घरांना मंजुरी देणे हे पहिले काम असेल. 25 डिसेंबर हा अटलजींचा वाढदिवस आहे, त्या दिवशी राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात 2 वर्षांचा बोनस दिला जाईल असल्याचेही विष्णूदेव साय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -