घरदेश-विदेशड्रॅगनला यु्द्धाची खुमखुमी; लडाखच्या दिशेने तैनात केली बॉम्बर विमाने!

ड्रॅगनला यु्द्धाची खुमखुमी; लडाखच्या दिशेने तैनात केली बॉम्बर विमाने!

Subscribe

काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने H-6 बॉम्बर विमाने तैनात

पूर्व लडाखमध्ये घुसखोरी केलेल्या भागातून चिनी सैन्याने माघार घ्यावी, यासाठी रविवारी मोल्डोमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य अधिकाऱ्यांमध्ये कमांडर स्तरावरील पाचव्या फेरीची बैठक झाली. यावेळी काशगर एअर बेसवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या एअर फोर्सने H-6 बॉम्बर विमाने तैनात केल्याचे सांगण्यात आले आहे.

६ शियान H-6 बॉम्बर विमाने चीनकडून तैनात

फास्ट मेल न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, पँगाँग लेकपासून काशगर एअर बेस ६९० किलोमीटर अंतरावर आहे. या पँगाँग टीएसओ क्षेत्रातून चिनी सैन्य अजूनही पूर्णपणे माघार घेतली नसल्याने सध्या त्या भागात तणावाची स्थिती कायम आहे. तर काशगर एअर बेसवर ६ शियान H-6 बॉम्बर विमाने चीनने तैनात केली आहेत. दोन विमानांमध्ये पेलोड म्हणजे शस्त्रसज्ज असल्याचेही वृत्त दिले आहे.

- Advertisement -

H-6 बॉम्बर विमाने अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम

लडाखपासून ६०० किमी अंतरावर हा विमानतळ आहे. सहा हजार किलोमीटर हा H-6 विमानांचा पल्ला असून १२ शियान JH-7 फायटर बॉम्बर आणि चार J11 / 16 फायटर विमाने तैनात केली आहेत. अलीकडेच दक्षिण चीन समुद्रात चीनच्या H-6J आणि H-6G विमानांनी युद्धसराव केला. H-6J विमाने YJ-12 जहाजविरोधी क्रूझ मिसाइल वाहून नेण्यास सक्षम असल्याचे सांगितले जात आहे.

लिपूलेख पासजवळ चीनने तैनात केली बटालियन

उत्तराखंडच्या लिपूलेख पासजवळ चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने आता बटालियनची तैनाती केली आहे. लडाख क्षेत्राबाहेर झालेली ही पहिली तैनाती आहे. मागच्या काही आठवड्यांपासून या भागात चिनी सैन्याच्या हालचाली दिसत असल्याचे वृत्त हिंदुस्थान टाइम्सला देण्यात आले होते.

- Advertisement -

दरम्यान भारताने लिपूलेख पासपर्यंत ८० किमीचा रस्ता बांधला. तेव्हापासून हा मार्ग चर्चेत आहे. कारण नेपाळने यावर आक्षेप घेतला. नेपाळने आपल्या नकाशात बदल केला आहे. कालापानी, लिपूलेख, लिंपियाधुरा हे भारतीय भूभाग नकाशात आपल्या हद्दीत दाखवले आहेत. नेपाळमधील ओली सरकारच्या या निर्णयामुळे भारत-नेपाळ संबंधात फूट निर्माण झाली आहे.


चीनशी ४ हजार कोटी राखींच्या व्यापाराचे ‘बंध’ भारतीयांनी तोडले!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -