घरदेश-विदेशचीनशी ४ हजार कोटी राखींच्या व्यापाराचे 'बंध' भारतीयांनी तोडले!

चीनशी ४ हजार कोटी राखींच्या व्यापाराचे ‘बंध’ भारतीयांनी तोडले!

Subscribe

यंदा राखीचा सण 'हिंदुस्थानी राखी' च्या स्वरुपात साजरा करण्याचे अखिल भारतीय व्यापारी महासंघाचे आवाहन

आज सर्वत्र राखीपौर्णिमा अर्थात रक्षाबंधन उत्सव साजरा केला जात आहे. मात्र यंदाच्या रक्षाबंधनला भारतीयांनी चीनला मोठा फटका दिला आहे. दरवर्षी चीनशी होणारा रक्षाबंधनाला ४ हजार कोटींचा राखीचा व्यवसाय भारतीयांनी तोडला आहे. चीनला धडा शिकवण्यासाठी भारतीय नागरिकही आता सहभागी झाले असून भारतीय चिनी मालावर बहिष्कार घालू शकत नाही, हा चीनचा दावा फोल ठरला आहे. तर चिनी वस्तूंवरील बहिष्कार मोहीम आता देशभर सुरू असून ही मोहीम गेल्या १० जूनपासून अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) सुरू केली आहे. यंदा राखीचा सण ‘हिंदुस्थानी राखी’ च्या स्वरुपात साजरा करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला भारतीयांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे.

दरवर्षी ५० कोटी राख्यांचा व्यापार

मिळालेल्या माहितीनुसार, देशात दरवर्षी साधारण ५० कोटी राख्यांचा व्यापार होत असून ज्याची किंमत जवळपास ६ हजार कोटी रुपये आहे. पण गेल्या अनेक वर्षांपासून चीनमधून राखी किंवा राखीसाठी लागणारे साहित्य आयात होत आहे. हा राखीचा माल सुमारे ४ हजार कोटींचा असून यंदा हा माल भारतात आयात झालेला करण्यात आलेला नाही.

- Advertisement -

ऑनलाइन राख्या खरेदी करण्यावर भर

अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (कॅट) सुरू केलेल्या मोहिमेचा हा एक भाग असून त्याचा फायदा झाला असल्याचे सांगितले जात आहे. तर यावर्षी भारतीय वस्तूंचा वापर राखी बनवण्यास झाला असून अंगणवाडीत काम करणाऱ्या महिलांसह इतर कष्टकरी हातांना रोजगार मिळाला असून भारतीय बनावटीच्या राख्या बाजारात उपलब्ध झाल्या आहेत आणि देशभरात या राख्यांना चांगलीच मागणी आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदा सर्वच सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन केले जात आहे. त्यामुळे बरेच नागरिक बाजारात न जाता ऑनलाइन राख्या खरेदी करण्यावर भर दिला आहे.


RakshaBandhan 2020: रक्षाबंधनसाठी पूजेची थाळी अशी तयार करा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -